Akshata Chhatre
बुधवारपासून गोव्यात आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात झाली आहे. काल संध्याकाळी झालेल्या रेड कार्पेटच्या इव्हेंटमध्ये अनेक सिनेस्टारनी हजेरी लावली.
गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर या काळात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रंगणार आहे.
IFFI चा उद्घाटन सोहळा २० नोव्हेंबर रोजी ताळगाव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये पार पडला.
सनी कौशल, भूमी पेडणेकर, मनुषी चिल्लर, बोमन इराणी असे चित्रपटस्टार यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी श्री. श्री रविशंकर यांच्यासोबत आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची नांदी केली.
या सोहळ्यात कलाकारांनी खास सादरीकरण देखील केले.
गुरुवारपासून सुरु होणाऱ्या चित्रपटांचे वेळापत्रक पाहण्यासाठी इफ्फीच्या संकेतस्थळाला (https://iffigoa.org/) थेट द्यावी लागेल आणि याच संकेतस्थळावर सिनेरसिकांना चित्रपटाचे बुकिंग करता येणार आहे.