Francisco Sardinha Dainik Gomantak
गोवा

Francisco Sardinha : गोव्यात कायदा, सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ

गृह खाते सुधारा अन्यथा पर्यटक पाठ फिरवतील; खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचा निशाणा

गोमन्तक डिजिटल टीम

Francisco Sardinha : गोव्यात व केंद्रात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा गोव्यात खून होतो, तेव्हा सर्वत्र असा संदेश जातो की गोव्यात कायदा व सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला आहे, असा आरोप दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

शवचिकित्सा अहवालात भाजप नेत्या सोनाली फोगाटच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा असल्याचे सिद्ध झाले आहे. गोव्यात खाण व्यवसाय बंद आहे, तेव्हा गोवा सर्वतोपरी पर्यटन व आदरातिथ्य या दोन्ही व्यवसायावर अवलंबून आहे. अशा परिस्थिती गोव्यात कायदा व सुव्यवस्था ढेपाळता कामा नये, असेही सार्दिन म्हणाले. गोव्यातील गृह खाते सुधारले पाहिजे नाही, तर गोव्यात पर्यटक येणे कमी होईल. याचे कारण आता केरळ किंवा देशातील इतर राज्येसुद्धा पर्यटनावर भर देत आहेत व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तरीसुद्धा गोव्यातील निसर्गसंपन्न परिसर, समुद्र किनाऱ्यांमुळे पर्यटक येत आहेत तो एक उपकारच म्हणावा लागेल, असेही सार्दीन म्हणाले.

गोव्यातील बेकायदेशीर जमीन विक्री प्रकरणाबद्दल सार्दिन म्हणाले, की या खात्यामधील अधिकारीच या बेकायदेशीर कामामध्ये गुंतले आहेत. सरकारने त्यांच्यावर प्रथम कारवाई करावी व त्यांना शिक्षा करावी. लोकांना जन्म दाखले ताबडतोब देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सार्दिन यांनी केली.

‘कंत्राटी कामगारांना कायम करा

सरकारी खात्यांमध्ये नोकरभरती चालू आहे ही चांगली गोष्ट असली तरी जे 10-15 वर्षे अजूनही कंत्राटी पद्धतीवर काम करतात त्यांचे काय? जास्त करून आरोग्य खात्यामध्ये पाच वर्षांपेक्षा जास्त काळ कंत्राटी पद्धतीवर कामावर असलेल्यांना कायमस्वरूपी तत्त्वावर घ्यावे अशी मागणीही सार्दिन यांनी केली.

‘शेतकऱ्यांना खते, यंत्रे अनुदानित किमतीत द्या’

हल्लीच जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी ज्या शेतांमध्ये लागवड होत नाही ती जमीन सरकार ताब्यात घेईल असे म्हटले होते. त्यावर भाष्य करताना सार्दिन म्हणाले, की मीसुद्धा एकेकाळी कृषिमंत्री व सुभाष शिरोडकर कृषी राज्यमंत्री होते. आताचे युवक शिकलेले आहेत. ते नोकऱ्यांच्या मागे धावतात. शिवाय कृषी व्यवसाय महाग झालेला आहे. शेतजमीन ताब्यात घेण्याऐवजी सरकारने शेतकऱ्यांना खत किंवा यंत्र सामुग्री अनुदानित किमतीत देणे गरजेचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT