Weather Updates
Weather UpdatesDainik Gomantak

Goa Monsoon Update : मॉन्सून 15 दिवस आधीच माघारी परतणार

मोठी तूट शक्य : राजस्थानमधून एक सप्टेंबरपासूनच परतीचा प्रवास; वेधशाळेचा अंदाज
Published on

Goa Monsoon Update : दरवर्षी सामान्यत 15 सप्टेंबरला माघारी फिरणारे नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) एक सप्टेंबरला परतीच्या प्रवासावर निघण्याचे संकेत आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानातून मॉन्सून माघारी फिरण्याचे अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. राज्यातून ही याच दरम्यान पाऊस अलविदा करेल असा कयास आहे.

25 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या दोन आठवड्यांच्या कालावधीसाठीचा अंदाज हवामान खात्याने जाहीर केला आहे. यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून परतण्यास पोषक वातावरण तयार होत असल्याचे नमूद आहे. 2021 मध्ये मॉन्सूनने 6 ऑक्टोबरला राजस्थानातून परतीला सुरुवात केली होती. यंदा त्या तुलनेत तब्बल 35 दिवस अगोदरच मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाचे संकेत आहे.

Weather Updates
Goa Crime : हडफडे बागा येथे तरुणाचा संशयास्पद मृत्यू

राज्यात 8.9 टक्के कमी पाऊस

यंदाच्या हंगामात शुक्रवारपर्यंत (26 ऑगस्ट) देशभरात 717.6 मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या तुलनेत आठ टक्के अधिक पाऊस झाला. राज्यात पावसाची वक्रदृष्टी झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत 2366 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून 2597.6 मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होता. आतापर्यंत 8.9 टक्के पाऊस कमी झाला आहे. येथून पुढे हे प्रमाण असेच राहिल्यास राज्यात प्रथमच मोठी तूट निर्माण होणार आहे, असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे.

यंदा प्रथमच मोठे अंतर

राज्यात 1 जून ते 30 सप्टेंबर हे पावसाचे दिवस मानले जातात. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच पावसाच्या सलगतेमध्ये मोठे अंतर पडले. यंदा पावसाने 10 दिवस उशिरा हजेरी लावली. त्यानंतर 14 ते 20 जून असे 6 दिवस उघडीप घेतली. तर 18 जुलै ते 5 ऑगस्ट असे तब्बल 17 दिवस दांडी मारली आहे. यामुळे पावसाची मोठी तूट झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com