Gas Cylinder  Dainik Gomantak
गोवा

सरकार ‘इलेक्शन मोड’मध्ये; घरगुती गॅस सिलिंडर केले एवढे स्वस्त...

फ्रान्सिस सार्दिन: मतदारांना आकर्षित करण्‍याचा प्रयत्‍न

दैनिक गोमन्तक

केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडर 200 रुपये स्वस्त करून सरकार ‘इलेक्शन मोड’मध्ये असल्याचे दाखवून दिले आहे. तसेच लोकसभा निवडणुका फार दूर नाहीत, असे भाकितही दक्षिण गोव्याचे कॉंग्रेस खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

गेल्या कित्येक वर्षांपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढतच होत्या. हे सिलिंडर आताच स्वस्त करण्याचे कारण काय, असा प्रश्नही सार्दिन यांनी यावेळी केला. सिलिंडरच्या किंमती कमी करणे हे सरकारचे मतदारांना आकर्षित करण्याचे पहिले पाऊल आहे,असेही सार्दिन म्हणाले.

सरकारने डिझेल व पेट्रोलच्या किंमतीही कमी कराव्यात. कॉंग्रेस सरकार होते तेव्हा पेट्रोलचे दर प्रति बॅरल दर 120 डॉलर होते, तरीही देशात पेट्रोल व डिझेलच्या किंमती आता आहेत, त्यापेक्षा कमीच होत्या. आता पेट्रोलचे दर प्रति बॅरल 80 ते 84 डॉलर असूनही देशात पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचे सार्दिन यांनी सांगितले. गोव्यात सध्या डेंग्युचा फैलाव होत असून वेळीच खबरदारीचे उपाय योजावेत, असेही त्‍यांनी सुचविले.

सिलिंडर स्वस्ताईने हुरळून जाऊ नका

आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती स्वस्त केल्या म्हणून नागरिकांनी हरळून जाऊ नये. निवडणुका झाल्या, की लगेच सरकार हेच दर परत एकदा वाढवेल,असेही सार्दिन यांनी सांगितले.

रेल्वे मार्गाचे जे दुपदरीकरण चालू आहे, त्याचा भविष्यात फायदा आहे, हे कोणी नाकारत नाहीत. तरीही ज्या लोकांना आपल्या गावात दुपदरीकरण नको आहे, तिथे सरकारने करू नये. माजोर्डा ते वास्को दरम्यान दुपदरीकरणासाठी जागा नसल्याने त्या भागात दुपदरीकरण करू नये, असे सार्दिन यांनी सुचविले. आपण या संदर्भात रेल्वे मंत्रालयाशी बोललो आहे. लोकसभेतही हा मुद्दा मांडलेला आहे,असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT