Goa Tourism: गोव्याचा निसर्ग घालतोय पर्यटकांना साद! नेत्रावळीतील धबधबे पर्यटकांसाठी खुले

बंदी हटवली : वनमंत्री विश्‍‍वजीत राणे यांची घोषणा; सर्व धबधब्यांवरील बंदी तब्‍बल ५० दिवसांनंतर उठविण्यात आली.
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak

नेत्रावळीतील सावरी धबधब्यात बुडून दोघांचा मृत्‍यू झाल्‍यानंतर ९ जुलैपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेल्‍या सर्व धबधब्यांवरील बंदी तब्‍बल ५० दिवसांनंतर उठविण्यात आली. नेत्रावळीतील सर्व धबधबे आजपासूनखुले करीत असल्याची घोषणा वनमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी केली.

Goa Tourism
Sanjay School: दुसऱ्या मजल्यावरून पडून दिव्यांग तरुण गंभीर; संजय स्कूलच्या जुन्या इमारतीतील प्रकार

नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रात निसर्ग इंटरप्रेटेशन केंद्राच्या कोनशिला अनावरणप्रसंगी राणे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत सांगेचे आमदार तथा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार तथा गोवा वनविकास महामंडळाच्‍या अध्‍यक्षा डॉ. दिव्‍या राणे, सरपंच बुंडा वरक, पंच राखी नाईक प्रभुदेसाई, मुख्य वनपाल राजीवकुमार गुप्ता, मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल इतर अधिकारी उपस्थित होते.

राज्‍याच्‍या गावागावांत असलेल्या निसर्गसंपदेचा आनंद लुटण्‍यासाठी येणाऱ्यांना नक्कीच चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. मात्र वन खात्याच्या नियमांचे पालन करणेही तेवढेच महत्वाचे आहे. दारू पिऊन दंगामस्ती करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. वनरक्षक आणि पोलिस तपासाला सामोरे जावे लागेल. गरज पडल्यास दारू पिऊन आलेल्या पर्यटकांना 25 हजार रुपयांपर्यंत दंड देण्याची तरतूद केली जाणार असल्याचे राणे यांनी स्‍पष्‍ट केले.

Goa Tourism
Teacher Molesting Student: फातर्पा सरकारी शाळेत विद्यार्थिनीवर विनयभंग; PE शिक्षक जेरबंद

‘त्‍या’ कुटुंबाला करणार मदत, आमदार सुभाष फळदेसाई यांनीही विचार मांडले.

जुलै महिन्‍यात सावरी धबधब्यावर जनार्दन सडेकर आणि शिवदत्त नाईक या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. पैकी शिवदत्त नाईक यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी पंच राखी नाईक यांनी केली. त्‍यावर वनमंत्री राणे यांनी आपण मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्‍याचा प्रयत्‍न करणार असल्‍याचे आश्‍‍वासन दिले. तर, नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रात स्थानिक युवकांना अल्पवेतनावर राबवून घेतले जात असल्याची

तक्रार नाईक यांनी दिव्‍या राणे यांच्याकडे केली. ‘आपण यात लक्ष घालून नक्कीच वाढीव पगार देण्यासाठी प्रयत्न करेन’ असे राणे म्‍हणाल्‍या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com