francis newton souza auction Dainik Gomantak
गोवा

The Castle Auction: कोट्यवधींना होणार सूझांच्या 'द कॅसल' चित्राचा लिलाव, भारतातील या दुर्मिळ कलाकृतीची खासियत काय?

Francis Newton Souza The Castle: फ्रान्सिस न्यूटन सूझा यांचे 'द कॅसल' हे दुर्मिळ चित्र अस्तागुरु या संस्थेच्या ऑनलाइन लिलावात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे

Akshata Chhatre

The Castle Souza Artwork: आधुनिक भारतीय चित्रकलेतील एक अग्रगण्य नाव, फ्रान्सिस न्यूटन सूझा यांचे 'द कॅसल' हे दुर्मिळ चित्र अस्तागुरु या संस्थेच्या ऑनलाइन लिलावात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. या चित्राची अंदाजित किंमत ४ ते ६ कोटी रुपये असून २९ आणि ३० ऑगस्ट रोजी हा लिलाव होणार आहे.

१९५७ साली तयार झालेले हे ऑइल पेंटिंग मेसोनाइट बोर्डवर असून, त्याची लांबी-रुंदी ४८ बाय ३० इंच आहे. अस्तागुरुचे संचालक सनी चांदीरामानी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, "'द कॅसल' हे सूझांच्या सुरुवातीच्या कामांपैकी एक उत्कृष्ट उदाहरण आहे, जे त्याच्या वेगळेपणामुळे लक्ष वेधून घेते."

सूझांच्या कलेचा अनोखा नमुना

या चित्रात सूझा यांची विशिष्ट शैली दिसून येते, ज्यात त्यांनी जाड, काळ्या रेषांचा वापर करून किल्ल्याला तीक्ष्ण आणि कोनीय आकार दिला आहे. त्यामुळे चित्रात एक प्रकारची दृढता जाणवतो. सूझांच्या इतर चित्रांमध्ये गर्दीचे आणि गुंतागुंतीचे शहरांचे दृश्य दिसते, त्याहून हे चित्र वेगळे आहे.

यात एकाच, ठाम अशा इमारतीवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. चांदीरामानी सांगतात, "१९५७ मध्ये, जेव्हा सूझा आधुनिक चित्रकार म्हणून आपली ओळख निर्माण करत होते, त्या काळात हे चित्र तयार झाले. हे चित्र त्यांच्या नेहमीच्या शहरांच्या गर्दीतून बाहेर पडून एकच ठाम इमारत दर्शवते."

संग्रहालय योग्य कलाकृती

या चित्राचा उभट आकार हा सूझांच्या कामात क्वचितच आढळतो. किल्ल्याच्या गडद रेषा आणि आतून येणारा तेजस्वी प्रकाश यांचा नाट्यमय मिलाफ या चित्राला एक वेगळेपण देतो. चांदीरामानी यांच्या मते, हे चित्र केवळ सूझांच्या भावना आणि रूपावरील पकडीचा पुरावा नाही, तर त्यांच्या कारकिर्दीतील या टप्प्यावरील तीव्र आणि प्रभावी कलेचे दर्शन घडवणारी एक दुर्मिळ आणि संग्रहालय-योग्य कलाकृती आहे.

हे चित्र मूळतः मुंबईतील एका संग्राहकाकडे होते. यापूर्वी ते हॅरोल्ड कोव्हनर यांच्या मालकीचे होते, जे सूझांच्या सुरुवातीच्या काळात त्यांना पाठिंबा देणारे एक महत्त्वाचे कलाप्रेमी होते. 'द कॅसल' यापूर्वी सोथबीज या जागतिक कला लिलाव संस्थेद्वारे विक्रीसाठी ठेवले गेले होते. हा लिलाव जगभरातील कलाप्रेमींना सूझांच्या कलेचा एक प्रतिष्ठित नमुना मिळवण्याची दुर्मिळ संधी देत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway: कोल्हापूरला वगळलं; शक्तीपीठ महामार्ग भूसंपादनासाठी सरकारकडून आदेश जारी

Monthly Numerology Prediction September 2025: सप्टेंबर महिन्यात मूलांक 1 ते 7 पर्यंतच्या लोकांचे नशीब उजळणार, मोठा धनलाभ होणार; मान-सन्मान वाढणार!

गोव्याच्या गणेशोत्सवात रमली अभिनेत्री समीरा रेड्डी; फोटो शेअर करत म्हणाली, 'ही नवी सुरुवात...'

Viral Video: अटारी बॉर्डरवर पाकड्यांची 'पोलखोल'! पाकिस्तानच्या बाजूला कचऱ्याचे साम्राज्य, तर भारताची बाजू स्वच्छ; पावसाचा व्हिडिओ व्हायरल

Goa Film Shooting: फिल्म इंडस्ट्रीला सावंत सरकारचं 'गिफ्ट', गोव्यातील शूटिंगसाठी आता सिंगल-विंडो सिस्टिम; वेळ आणि पैशाची होणार बचत

SCROLL FOR NEXT