Sameer Amunekar
हैदराबाद येथील चित्रकार आणि शिल्पकार स्नेहलता प्रसाद यांचं 25 वं एकल कला प्रदर्शन गोरवावाडो-कळंगुट येथील आर्ट चेंबर- गॅलरीया दी बॅलास आर्ट्समध्ये आजपासून सुरू होत आहे.
हे कला प्रदर्शन म्हणजे तिचा सर्जनशील दृष्टीकोन प्रतिबिंबित करणारा त्यांच्या कलाकृतींचा संग्रह असेल.
स्नेहलता स्वतः देशात अनेक ठिकाणी चित्रकारांची सामूहिक कला प्रदर्शनं, कला शिबिरं तसंच कलेसंबंधाने चर्चासत्र आदी उपक्रम आयोजित करत असतात.
स्नेहलता जरी आता हैदराबादला वास्तव्य करून असली तरी त्या मूळच्या राजस्थानमधल्या आहेत.
राजस्थानच्या असल्यामुळं वातावरणातील रंग-सौंदर्य जाणण्याची आणि ते चित्रातून मांडण्याची जन्मजात जाणीव स्नेहलता यांना आहे.
‘फाईन आर्ट- पेंटिंग’ या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तिने त्याच विषयामधली डॉक्टरेट मिळवली आहे त्यातून तिच्या कलाकृती संशोधन आणि अभ्यास असा सशक्त आयाम घेऊन येतात.