Dainik Gomantak
Dainik Gomantak
गोवा

Bank Robbery : केरी बँक दरोडा प्रकरणातील चौथ्या आरोपीला पुण्यातून अटक

गोमन्तक डिजिटल टीम

केरी-सत्तरी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या व्यवस्थापकाचे अपहरण करून व पिस्तुलाचा धाक दाखवून एका टोळीने बँक लुटली. या टोळीतील तिघांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. या दरोडा प्रकरणातील चौथ्या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. वाळपई पोलिस संशयित आरोपीला घेऊन गोव्याकडे रवाना झाले आहेत.

किरण घोरपडे (रा. विजापूर) असे अटक संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिस निरीक्षक प्रज्योत फडते, पोलिस कॉन्सस्टेबल अनिल देसाई, गौरव वायंगणकर, गणपतराव देसाई, आत्माराम गावस यांनी ही कारवाई केली.

यापूर्वी गोवा पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडून 5.50 लाख रक्कम तसेच 1 किलो 100 ग्रॅम सोने पूर्णपणे जप्त करण्यात आले. दरोडेखोरांनी बँक लुटण्यासाठी वापरण्यात आलेली व्हॅगनर गाडी (जीए 01 आर 7724), बँक व्यवस्थापकाला धमकावण्यासाठी वापरलेली एअर गन (पिस्तुल) व चाकू तसेच चोरलेली 8.75 लाख रोख रक्कमेपैकी 5.50 लाख रुपयांची रक्कम व 50 लाखांचे 1.100 किलो संशयिताकडून जप्त करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'धर्म खतरे में है' म्हणत गोव्यात मते मागितली, माघार घेण्यासाठी आरजीचा जन्म नाही झाला- मनोज परब

Harmal Road : हरमल-चोपडे रस्‍ता धोकादायक; साकव अपूर्णावस्थेत

Actor Srikanth: अभिनेता श्रीकांत फॅमिलीसोबत गोव्यात करतोय सुट्ट्या एन्जॉय; फोटो व्हायरल!

Loksabha Voting Panaji : पणजीत मतदान कमी का झाले? स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अनियोजित कामामुळे पणजीकर नाखुश

Sasashti News : ‘ख्रिश्‍चन’ विवाहासाठी वेळ वाढवा; चर्चिल यांची मागणी

SCROLL FOR NEXT