The High Court Of Bombay At Goa  Dainik Gomantak
गोवा

Pomburpa News: पोंबुर्फातील ‘ती’ कारणे दाखवा नोटीस निकालात काढा! गोवा खंडपीठाचा निर्देश

Pomburpa Salvador De Mundo Illegal Construction: साल्वादोर द मुंदमधील सर्वे क्रमांक २९२/१-एल-७ मध्ये ना विकास उतरणी क्षेत्रात तेथील झाडांची कत्तल तसेच डोंगरकापणी करून सुरू असलेल्या बेकायदा बांधकामाविरोधात जनहित याचा उच्च न्यायालयात तेथील स्थानिकांनी दाखल केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पोंबुर्फा पंचायत क्षेत्रात साल्वादोर द मुंदमधील सर्वे क्रमांक २९२/१-एल-७ मधील बेकायदा बांधकामाला नगर नियोजन खात्याने बजावलेल्या कारणेदाखवा नोटिशीवरील सुनावणीवेळी याचिकादाराला बाजू मांडण्यास संधी द्यावी व त्यावरील सुनावणी चार आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जनहित याचिकेवरील सुनावणी २४ नोव्हेंबरला ठेवली आहे.

साल्वादोर द मुंदमधील सर्वे क्रमांक २९२/१-एल-७ मध्ये ना विकास उतरणी क्षेत्रात तेथील झाडांची कत्तल तसेच डोंगरकापणी करून सुरू असलेल्या बेकायदा बांधकामाविरोधात जनहित याचा उच्च न्यायालयात तेथील स्थानिकांनी दाखल केली होती. या सुनावणीवेळी बांधकाम करणाऱ्या तरुण तहलानी याने याचिकेवरील निर्णय होईपर्यंत पुढील बांधकाम बंद ठेवले जाईल, अशी हमी दिली होती.

त्यानुसार उच्च न्यायालयाने नगर नियोजन खात्याला या परिसराची पाहणी करून योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश नोटीस बजावून दिले होते. नगर नियोजन खात्याने तहलानी यांना कारणेदाखवा नोटीस बजावून त्याला उत्तर देण्यासाठी येत्या १४ ऑक्टोबरला सुनावणी ठेवली आहे. खात्याने याचिकादाराने केलेल्या तक्रारीच्या आधारे ही नोटीस बजावली आहे असे त्यात नमूद केले आहे तरी सुनावणीसंदर्भातची नोटीस खात्याने याचिकादाराला दिली नाही ही बाब आज याचिकादारांचे वकील कार्लोस फेरेरा यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

गोवा

नगर नियोजन खात्याने या बांधकामाला परवानगी देताना प्रादेशिक आराखडा २००१ गृहित धरून नव्या प्रादेशिक आराखडा २०२१ आधारे परवाने दिले होते. तेथील डोंगराळ भाग हा २५ अंश उतरणीपेक्षा अधिक असतानाही त्याची कापणी करून त्याचे सपाटीकरण सुरू असल्याचा दावा जनहित याचिकादाराने केला होता.

उच्च न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेत नगर नियोजन खात्याकडे उत्तर मागितले होते. खात्याने याप्रकरणी तपासणी करून तहलानी यांनी केलेल्या उल्लंघनप्रकरणी कारणेदाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती दिली. खात्याने या नोटीसवरील सुनावणीवेळी याचिकादाराचीही बाजू ऐकून घ्यावी. सुनावणी घेऊन ही नोटीस चार आठवड्यात निकालात काढावी असे निर्देश दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT