Accident Dainik Gomantak
गोवा

Accident in Farmagudi: फर्मागुडी येथे चार वाहनांचा विचित्र अपघात; ब्रेक फेल झाला अन्...

फर्मागुडी मुख्य रस्त्यावर झाला अपघात

दैनिक गोमन्तक

गोवा राज्यातील अपघातांचे सत्र सुरुच असून दररोज अपघात तर होतोच. मात्र अपघातात कुटुंबातील कमावत्या युवकांचा बळी जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर येते आहे. या पार्श्वभूमीवर आज फर्मागुडी येथे विचित्र अपघात झाला असून या अपघातामध्ये चार वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. (Four vehicles have been involved in an accident on the main road at Farmagudi)

मिळालेल्या माहितीनुसार फर्मागुडी मुख्य रस्त्यावर चार वाहनांचा विचित्र अपघातात झाला आहे. एक ट्रक फोंड्याहून पणजीकडे जात होता हा ट्रक फर्मागुडी येथे आला असता ट्रकचा ब्रेक फेल झाला. यावेळी ट्रक चालकाने तो बाजूला वळला मात्र यामुळे बाजूने जाणारी दुचाकी थेट या ट्रकखाली गेली. दरम्यान पी. एस कॉलेजकडे ट्रॅफिक जाम झालेले असल्याने रस्त्यावर वाहनांचा ओघ अधिक होता. या रस्त्याने येणारी बस ही या ट्रकला धडकली असल्याची माहिती समोर आली आहे.

या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुचाकी चक्काचूर झाला आहे. तसेच दुचाकी चालक जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. असे असले तरी रस्त्यावरील वाहनांची वर्दळ पाहता वेळेतच ट्रक थांबला अन्यथा मोठी हानी झाली असती असे काही प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे. या अपघातील वाहनमालकांची तसेच जखमी दुचाकीचालकाची माहिती मिळू शकलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: बोरकरांची 'गुपिते' खोलकरांकडे!

Goa Enough Is Enough: 'इनफ्‌ इज इनफ्‌'चा शुक्रवारी एल्गार!" पणजीतील 'टीसीपी' कार्यालयाबाहेर महासभेची हाक; वादग्रस्त कलम '39-अ' रद्द करण्याची मागणी

Goa Congress: "इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या परिणामांचा सखोल अभ्यास आधी करा!" राज्यातील नव्या इंधन धोरणावरून मागणी करत काँग्रेस आक्रमक

"निवृत्त कर्मचाऱ्याच्या 'ग्रॅच्युइटी'मधून बेकायदेशीरपणे वसूल केलेले पैसे तात्काळ परत करा!" गोवा मानवाधिकार आयोगाचा पेयजल विभागाला आदेश

Goa politics: "जनतेची दिशाभूल करण्यासाठी खोटी माहिती पसरवली!" फेरफार केलेल्या व्हिडिओ प्रकरणावरून, अजय खोलकर यांचा थेट आरोप

SCROLL FOR NEXT