Marathi Science Council Goa: 19 तारखेपासून गोव्यात मराठी विज्ञान परिषदेचे 57 वे अधिवेशन

जागतिक तापमान बदलाच्या आव्हानाबद्दल तीन दिवसांच्या अधिवेशनात होणार चर्चा
Marathi Science Council Goa
Marathi Science Council GoaDainik Gomantak

मडगाव: मराठी विज्ञान परिषदेच्या गोवा विभागाला यंदा पंचवीस वर्षे पूर्ण होत असून या रौप्य महोत्सवी वर्षापूर्वीचा कार्यक्रम म्हणून मराठी विज्ञान परिषदेचे 57 वे वार्षिक अधिवेशन यंदा गोव्यात होणार आहे. गोमंत विद्यानिकेतन अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

(57th Session of Marathi Science Council in Goa from 19th)

Marathi Science Council Goa
Goa Plastic Ban: 19 किलो 490 ग्रॅम प्लास्टिक वाळपई शहरात आतापर्यंत जप्त

19 ते 21 असे तीन दिवस हे अधिवेशन गोवा विद्यापीठाच्या सौजन्याने आयोजित केले जात असून विद्यापीठाच्या संकुलात ते भरणार असे वेर्लेकर यांनी सांगितले. यावेळी विद्या निकेतनचे सरचिटणीस सलील कारे तसेच गोवा मराठी विज्ञान परिषदेच्या रेश्मा राऊत देसाई हे उपस्थीत होते.

जागतिक तापमान वाढीमुळे झालेले बदल आणि आव्हाने या विषयावर या तीन दिवसांच्या अधिवेशनात चर्चा होणार असून त्यात भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांच्यासह प्रोफेसर एम.एम. शर्मा, प्रोफेसर ज्येष्ठराज जोशी, प्रोफेसर अनिरुद्ध पंडित , गोवा विद्यापीठाचे कुलगुरू हरिलाल मेनन तसेच अन्य नामांकित शास्त्रज्ञ भाग घेणार आहेत.

Marathi Science Council Goa
Mapusa Municipality: म्हापसा मार्केटमधील प्रश्न रेंगाळलेलाच!

19 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत या अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून त्या अधिवेशनात अनिल काकोडकर यांचे 'भारताचे हरितगृह वायू विरहित ऊर्जा निर्मितीकडे संक्रमण' या विषयावर महत्त्वाचे व्याख्यान होणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी गोव्यात विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिलेले श्रीकांत नागवेकर तसेच महाराष्ट्रातील संजय पाठक यांचा सन्मान होणार आहे. यावेळी प्रा. धुंडीराज वैद्य, डॉ. हितेंद्र सालिग्राम महाजन व प्रा. विकास लक्ष्मण माठे यांना एम. एम. शर्मा पुरस्कार देण्यात येणार आहे. गोवा आणि महाराष्ट्रातील सुमारे 250 विज्ञान प्रेमी प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com