Goa Police
Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: आभिमानास्पद ! गोवा पोलिसांना एकाचवेळी चार राष्ट्रपती पदके

दैनिक गोमन्तक

सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस खात्यातील चार अधिकाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. यामध्ये पोलिस महासंचालक जसपाल सिंग (आयपीएस), अधीक्षक विश्राम बोरकर, उपअधीक्षक संतोष देसाई आणि उपअधीक्षक हरिष मडकईकर यांचा समावेश आहे. (Goa Police Recieve 4 President's Police Medals)

गोवा पोलिसांना एकाचवेळी चार राष्ट्रपती पदके मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी गोव्यात अधीक्षक, पोलिस महानिरीक्षक म्हणून काम केले आहे.

तसेच विश्राम बोरकर यांनी राज्यपालांचे एडीसी म्हणून काम पाहण्यापूर्वी क्राईम ब्रँच, पोलिस मुख्यालयात उत्तम कामगिरी केली आहे.

या दोघांनाही यापूर्वी गुणवत्तेसाठी (मेरिटोरियस) राष्ट्रीय पोलिस पदक मिळाले असून दुसऱ्यांदा त्यांना विशेष सेवेसाठी (डिस्टिंग्वीश्‍ड) हे राष्ट्रीय पोलिस पदक जाहीर झाले आहे.

उपअधीक्षक देसाई आणि उपअधीक्षक मडकईकर यांना गुणवत्तेसाठी राष्ट्रीय पोलिस पदक जाहीर झाले आहे.

जसपाल सिंग

आयपीएस अग्मूट केडरमधील अधिकारी जसपाल सिंग हे 1996 साली भारतीय पोलिस सेवेत भरती झाले. दिल्लीतील गुज्जर आंदोलन तसेच अनेक गुन्हेगारी तपासकामात कौशल्य दाखवले होते.

गोव्यात कोविड महामारी काळात आयजीपी पदावर असताना त्यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला होता.

त्यांनी कोविड काळात कायदा व सुव्यवस्था चांगल्या प्रकारे हाताळली होती. त्यांनी दिल्ली, अंदमान निकोबारमध्ये संयुक्त आयुक्त म्हणून काम केले आहे.

संतोष देसाई

गेली 31 वर्षे पोलिस सेवेत असलेले संतोष देसाई यांनी दक्षिण गोव्यात उत्तम कामगिरी केली आहे. गुन्हेगारांविरोधात ठोस पावले उचलून गुन्हेगारी कमी केली होती.

2009 साली त्यांना मुख्यमंत्री पोलिस सुवर्ण पदक मिळाले 2002 साली त्यांना पोलिस निरीक्षकपदी बढती मिळाली.

तीनवेळा आग्वाद तुरुंगातून पलायन केलेल्या हिटलर फर्नांडिस याला कर्नाटकातून गजाआड केले होते.

हिटलर हा जो कोणी त्याच्याविरुद्ध न्यायालयात साक्ष देईल, त्यांना धमक्या देऊन दहशत निर्माण करायचा. त्याला अटक करण्याचे धाडस संतोष देसाई यांंनी दाखवले होते.

विश्राम बोरकर

पोलिस सेवेत उपनिरीक्षक म्‍हणून रुजू झालेले विश्राम बोरकर हे 1998 साली थेट पोलिस उपअधीक्षक झाले होते. त्यांनी मानवी तस्करी प्रकरणे तसेच पोलिस खात्यामध्ये मुख्यालयाचे अधीक्षक असताना अनेक बदल घडवले.

संगणक कक्ष, तपास प्रयोगशाळा, गोवा पोलिस गाणे, पोलिस प्रशिक्षण केंद्रासाठी लोगो, डीजीपीस इनसिग्निया सेवा पदक, सर्वोत्कृष्ट पोलिस स्थानक चषक असे अनेक उपक्रम त्यांनी सुरू केले.

2016 मध्ये त्यांना गुणवत्ता राष्ट्रपती पोलिस पदक तसेच मुख्यमंत्री पोलिस सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात आले आहे.

हरिष मडकईकर

1991 साली उपनिरीक्षक म्हणून गोवा पोलिस सेवेत रुजू झालेले हरिष मडकईकर यांनी अनेक पोलिस स्थानकांत काम केले आहे.

2003 साली निरीक्षकपदी बढती मिळाल्यावर त्यांनी अनेक गुन्ह्यांचा छडा लावला होता. 2002 मध्ये उपअधीक्षकपदी बढती मिळाल्यावर त्यांना ड्रग्सविरोधी कक्षाचा ताबा दिला होता.

त्यांच्या कारकिर्दीत 19 प्रकरणे नोंद झाली. 20 जणांना अटक करून 1.45 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. 2019 मध्ये त्यांना भारत स्वाभिमान 2019 पुरस्कार देऊन गौरवले होते.

डेन्स डिसोझा यांना मरणोत्तर पुरस्कार

गेल्या वर्षी हणजूण येथे लागलेल्या आगीत स्वतःचा जीव धोक्यात घालून हॉटेल मालकिणीला वाचविल्यानंतर सिलिंडर स्फोटात प्राण गमावलेल्या डेन्स डिसोझा यांना मरणोत्तर मुख्यमंत्री शौर्य पुरस्कार जाहीर झाला असून तो उद्या, 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिन कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT