Road Accident: कुंकळ्ळी येथे अपघातात नवविवाहितेचा जागीच मृत्यू

कुंकळ्ळीत अपघातांचे सत्र सुरूच असून सोमवारी व मंगळवारी वेगवेगळ्या अपघातांत चार जणांना जीव गमवावा लागला होता.
Road Accident in Goa |Goa News
Road Accident in Goa |Goa NewsDainik Gomantak

Road Accident in Goa: कुंकळ्ळीत अपघातांचे सत्र सुरूच असून सोमवारी व मंगळवारी वेगवेगळ्या अपघातांत चार जणांना जीव गमवावा लागला होता.

काल दुपारी दीडच्या सुमारास ओमिनी व्हॅन आणि स्कुटरच्या धडकेत नवविवाहिता वृत्ता प्रभू (24) यांचा मृत्यू झाला. त्या एका खासगी बँकेत कामाला होत्या.

मुळ ताळगाव-पणजी येथील रहिवाशी असलेल्या वृत्ता यांचा 16 डिसेंबरला सावरकटा येथील सिद्धेय आंगले यांच्याशी विवाह झाला होता. बुधवारी दुपारी जेवणासाठी बँकेतून त्या घरी जात होत्या.

Road Accident in Goa |Goa News
Mavin Gudinho: ..तर ‘त्या’ पंचायतींविरोधात होणार कारवाई- मंत्री गुदिन्हो

यावेळी कुंकळ्ळी बाजार परिसरातील कुराडे क्लिनिकजवळ स्कुटर आणि समोरून येणाऱ्या ओमिनी व्हॅनचा अपघात झाला. यात दुचाकीस्वार वृत्ता यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com