Goa Corona Latest Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: वास्को मामलेदार कचेरीतील चौघे कर्मचारी कोरोनाबाधित

मलेदार कचेरीत दोन्ही डोस घेतलेले चार कर्मचारी कोरोना बाधित आढळल्याने इतर कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे

दैनिक गोमन्तक

वास्को: येथील मामलेदार कचेरीत दोन्ही डोस घेतलेले चार कर्मचारी कोरोना बाधित आढळल्याने इतर कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. निवडणुकीच्या काळात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने निवडणूक आयोगासमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. गोव्यात कोविडची तिसरी लाट उफाळली असून दरदिवशी कोविड बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) महिन्यावर येऊन ठेपल्याने निवडणूक आयोगासमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. कारण बाधितांच्या संख्येत नागरिकांबरोबर शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. (Four employees at Vasco government office were corona positive) Goa Corona Latest News

सध्या शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस कर्मचारी निवडणूक कामकाजात व्यस्त असून प्रत्येकाला निवडणुकीचे काम वाटून दिले आहे. त्यानुसार सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे कर्मचारी कामात व्यस्त असतात. एखादा कर्मचारी आजारी पडला तर त्यांच्या कामावर मोठा परिणाम होतो.

वास्कोतील (Vasco) मामलेदार कार्यालयातील चार कर्मचारी ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत, ते कोविड बाधित आढळल्याने अधिकारी संकटात सापडले आहेत. कारण एकाच वेळी चार कर्मचारी बाधित आढळल्याने कामकाजावर परिणाम झालाच, उलट इतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपूर्वी येथील एक कर्मचारी आजारी होता. मात्र, तो कार्यालयात काम करत होता. नंतर तो कोविड (Corona Positive Case) बाधित आढळल्याने सर्व कर्मचारी भीतीच्या छायेत वावरत होते. आता आणखी तीन कर्मचारी बाधित आढळल्याने उर्वरित कर्मचारी भीतीच्या छायेखाली काम हाताळत आहेत.

निवडणूक आयोगासमोर आव्हान

आज मामलेदार कार्यालयात सेनिटायझेशन करण्यात आले. यावेळी सर्व कर्मचारी भयभीत होऊन बाहेर उभे होते. बाधितांची वाढती संख्या आणि निवडणूक तोंडावर आल्याने निवडणूक आयोगासमोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला आहे. कोरोनाच्या सावटाखाली आगामी विधानसभा निवडणुका पार पाडण्याचे आव्हान आयोगासमोर आहे.

घरोघरी फिरण्यावरही मर्यादा

सध्या बीएलओ घरोघरी भेट देत असून त्यांच्या समोरही पेच निर्माण झाला आहे. कारण आता ते ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांचे फाॅर्म भरून देण्याच्या गडबडीत आहेत. त्यातच जिथे तिथे कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने संसर्गाची टांगती तलवार त्यांच्यावर आहे. नंतर प्रत्येक घरात निवडणूक पत्रक वाटण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे बीएलओंपुढेही आव्हान आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT