Goa Accident Cases| Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Case: 24 तासांत चार अपघात; दोघांचा मृत्‍यू, चौघे जखमी

अन्साभाट-म्हापसा येथे पिकअप गाडीला धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident Case: राज्यात मागील 24 तासांत चार ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत दोघांना आपले प्राण गमवावे लागले असून चार जण जखमी झाले आहेत.

आज, रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास अन्साभाट-म्हापसा येथे पिकअप गाडीला धडकल्याने दुचाकीस्वार रॉडजर रंजनजी (23, रा. धुळेर-म्हापसा) याचा मृत्यू झाला.

या अपघातप्रकरणी म्हापसा पोलिसांनी पिकअप चालक बाळा गावडे (20, रा. हाऊसिंग बोर्ड-म्हापसा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

तर शनिवारी रात्री सांकवाळ येथे दोन दुचाकींच्या धडकेत मोपा येथील मजूर मंगल (मुळ रा. झारखंड) याचा मृत्यू झाला.

या घटनेत दोघे जखमी झाले. तिसरी घटना मोले येथील राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक वळणावर घडली.

येथे दुचाकी व टेम्पोच्या अपघातात दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला असून मोठ्या प्रमाणात दुचाकीचे नुकसान झाले आहे. शॅनॉन अल्वारीस (21) या जखमी दुचाकीस्वाराला गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.

वृद्ध जखमी

गणेशपुरी-मार्ना-शिवोली रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले. रस्ता खोदकामाचा इशारा देणारा कोणताही फलक ठेकेदाराने लावलेला नाही, त्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप यावेळी उपस्थितांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT