Illegal Tax Collection: पणजी महापालिकेत चाललंय काय? पावती न देताच सोपोची वसुली?

व्हिडिओ व्हायरल ः तो ‘मास्टर’ कोण? पणजी मासळी मार्केटमध्ये भ्रष्टाचार
Illegal Tax Collection
Illegal Tax CollectionDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji Muncipality Illegal Tax Collection पणजी मासळी मार्केटमध्ये सकाळी रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या विक्रेत्यांना कोणतीही पावती न देता अवैधपणे सोपोकर घेतला जात असल्याचा प्रकार आज उघडकीस आला.

माजी महापौर तथा नगरसेवक उदय मडकईकर यांनी या संदर्भातील व्हिडिओ समाज माध्यमांत सकाळी व्हायरल केला.

यामुळे महापालिकेतील सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विशेष बाब म्हणजे व्हिडिओत कर संकलन करणारा ‘मास्टर’ला सांग, असे म्हणत आहे. यावरून तो ‘मास्टर’ कोण? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

मडकईकर व्हायरल केलेल्या व्हिडिओत म्हणतात की, ‘महानगरपालिका कर्मचाऱ्यास कराची पावती का दिली जात नाही?, केव्हापासून पावती दिली जात नाही? आपण पोलिसांत तक्रार करू.’

त्यावर तो कर्मचारी ‘पात्रांवला सांग’, असे उत्तर देतो. त्यामुळे विना पावती सोपो कर गोळा करण्यास सांगणारा ‘पात्रांव’ कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय कदाचित मडकईकर यांना त्या पात्रांवचे नाव माहीत असावे, असे दिसते.

Illegal Tax Collection
बिबट्याचा ठिय्‍या माडावर, वनखात्‍याचे कर्मचारी मागावर

महापौरांकडून कानावर हात

या प्रकाराबाबत महापौर रोहित मोन्सेरात आणि उपमहापौर संजीव नाईक यांना विचारणा केली असता त्यांनी कानावर हात ठेवत काहीही बोलण्यास नकार दिला. परंतु बाजार समितीचे चेअरमन बेंटो लॉरीन यांनी या प्रकाराबाबत उद्या, सोमवारी आयुक्तांना भेटणार आहोत, असे सांगितले. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना मशिन देण्यास सूचित करणार असल्याचे सांगितले.

महापालिकेत चाललंय काय?

महापालिकेत सध्या काय चालले आहे, हे कोणास काहीच पत्ता लागत नाही. महापौर कधी सुटीवर असतात, तर उपमहापौर सफाई कर्मचारी करीत असलेल्या ठिकाणी फिरत असतात. आयुक्तांवर एकप्रकारचा दबाव असल्याचे सुरवातीपासूनच दिसून आले आहे.

यापूर्वी पाटो येथील एका बहुमजली व्यावसायिक इमारत खासगी मालकाकडून उभारली जात आहे. त्या इमारतीच्या कार्यालयांना रस्त्यावर थाटण्यासाठी त्या कंपनीकडून पाच लाख रुपये एका नगरसेवकाने घेतले होते, ही बाब ‘गोमन्तक’ने समोर आणली होती.

त्याशिवाय सांतिनेजमध्ये बेकायदेशीर बांधकाम उभारले जात असतानाही अभियंत्याच्या किंवा नगरसेवकाच्या लक्षात आले नाही.

Illegal Tax Collection
37th National Games: ‘क्रीडा पर्यटन’ ठरेल गोव्याची नवी ओळख- सावंत

‘गोमन्तक’ने याला वाचा फोडल्यावर ते काम थांबले आहे. त्याशिवाय शहरातील पे-पार्कंग कंपनीची मुदत फेब्रुवारी 2023 मध्ये संपली, तरीही कंत्राटदार कंपनी अजूनही पैसे आकारत असल्याचे समोर आले.हा विषय महानगरपालिकेत चर्चेचा विषयही ठरला होता.

50 लाखांचा घोटाळा: मडकईकर

1. महापालिकेत दोन वर्षे मडकईकर महापौर राहिले आहेत, त्यामुळे येथील सोपोकराचा घोळ त्यांना माहित आहे. तत्कालीन बाजार समिती अध्यक्ष शेखर डेगवेकर यांनी सोपो संकलनासाठी मशिन अनिवार्य केल्या होत्या.

2. सोपो मशीन बिघडल्याचे कारणही त्यावेळी कर संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांना दिले होते. त्यानंतर मशीनद्वारे कर संकलन होताच त्या विक्रेत्यास पावती दिली जात होती.

3. परंतु आता मडकईकर यांनी हा व्हिडिओ टाकल्याने अशापद्धतीने विनापावती कर संकलनाचा प्रकार अनेक महिन्यांपासून सुरू असावा, असे स्पष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com