Ravi Naik | Adv Narendra Sawaikar  Dainik Gomantak
गोवा

पंतप्रधान मोदी म्हणजे सर्वांना सोबत घेऊन चालणारा विश्‍वनेता! नरेंद्र सावईकर यांचे उद्गार

Goa News: बांदेकर फार्मसी महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आर. बालसुब्रमण्यम यांनी लिहिलेल्या ‘पावर विदीन...‘ या पुस्तकावर चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: एखाद्या सामान्य व्यक्तीकडून असामान्यत्वाकडे झेप घेताना पाहिले की, अशा व्यक्तीचा आदर्श हा समाजात रूजावा असे वाटते, आणि त्यादृष्टीने देशाचे पंतप्रधान हे आजच्या युवा वर्गासाठी आदर्श आहेत, असे उद्गार माजी खासदार तथा अनिवासी भारतीय आयुक्त ॲड. नरेंद्र सावईकर यांनी काढले.

फर्मागुढी - फोंड्यात काल फोंडा शिक्षण संस्थेच्या बांदेकर फार्मसी महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आर. बालसुब्रमण्यम यांनी लिहिलेल्या ‘पावर विदीन...‘ या पुस्तकावर चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. या कार्यक्रमाला फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक, अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर, फोंडा शिक्षण संस्थेचे सचिव तथा नगरसेवक रितेश नाईक, संयोजक गोरख मांद्रेकर, प्राचार्य विकास पिसुर्लेकर तसेच प्रा. रसिका गावकर व प्रा. पद्मजा कामत आदी मान्यवर व्यासपीठावर होते.

नरेंद्र सावईकर म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या कारकिर्दीचा ठसा देशाच्या राजकारणावर आणि समाजकारणावर उमटला आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणारा हा विश्‍वनेता आहे. फोंड्याचे आमदार रवी नाईक यांची राजकारणातील गरुडभरारी पाहता असामान्यत्वाकडे झेप घेणारा हा गोव्यातील नेता आहे, हे कुणीही मान्य करील.

त्यामुळे एखाद्या नेत्याचा आदर्श घेताना त्याने देशासाठी काय केले, याचा आलेख युवकांपुढे ठेवावा, असे आवाहन सावईकर यांनी केले. ॲड. सतीश पिळगावकर यांनी सूत्रसंचालन केले तर प्रास्ताविक गोरख मांद्रेकर यांनी केले. प्रा. रसिका गावकर, प्रा. पद्मजा कामत यांनी पुस्तकावर भाष्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT