Narendra Sawaikar: ती बातमी खोटी! दक्षिण गोव्यातून भाजपची उमेदवारी मिळाल्याचे वृत्त सावईकरांनी फेटाळले

Narendra Sawaikar On BJP Loksabha Ticket: उमेदवारीची अधिकृत घोषणा न झाल्याची सावईकरांची फेसबुकद्वारे माहिती
Narendra Sawaikar On BJP Loksabha Ticket
Narendra Sawaikar On BJP Loksabha TicketDainik Gomantak

Narendra Sawaikar On BJP Loksabha Ticket For South Goa

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. सर्वच पक्ष लोकसभेसाठी मोर्चेबांधणी आणि उमेदवारांची चाचपणी करत आहेत. गोव्यात लोकसभेच्या दोनच जागा असल्यातरी सत्ताधारी भाजप आणि विरोधक काँग्रेस पक्षही राज्यात त्यांचेच उमेदवार बाजी मारणार असा दावा करत आहेत.

दरम्यान, दोन्ही पक्षाने अद्याप उमेदवारांची घोषणा केलेली नाही. अशात दक्षिण गोव्यात भाजपने नरेंद्र सावईकरांना उमेदवारी दिल्याचे वृत्त समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. सदर बातमी खोटी असल्याची माहिती खुद्द नरेंद्र सावईकरांनी दिली आहे.

काय म्हणाले नरेंद्र सावईकर?

"दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून माझी निवड झाल्याची एक बातमी समाज माध्यमाद्वारे (सोशल मीडिया) प्रसारित झाल्याचे मला अभिनंदनाचे संदेश येऊ लागल्यानंतर समजले. तरी मी स्पष्ट करू इच्छितो कि अशी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही."

"भारतीय जनता पार्टीच्या कामाची एक कार्यपद्धती आहे. मी पार्टीचा एक जबाबदार कार्यकर्ता व पदाधिकारी आहे. तरी यासंदर्भात अधिकृत निर्णय झाल्यानंतर सर्वांनाच समजेल," अशी पोस्ट सावईकरांनी फेसबुकवरती पोस्ट केली आहे.

दक्षिण गोव्यात सध्या काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन खासदार आहेत, तर 2014 साली दक्षिणेत सावईकर खासदार होते. दक्षिणेत यावेळी सावईकरांनाच भाजप संधी देणार असल्याची जोरदार चर्चा राज्यात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

भाजप उत्तर गोव्यात मजबूत स्थितीत असून, यावेळी त्यांनी दक्षिणेत लक्ष केंद्रीत केले आहे. यापूर्वी गृहमंत्री अमित शहा आणि अलिकडे झालेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा देखील दक्षिणेत गोव्यातच आयोजित करण्यात आली होती.

राज्यातील दोन्ही जागेवर भाजपच विजयी होईल असा विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला असला तरी अद्याप उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com