Former MLA of Cortalim Alina Saldanha visited village

 

Dainik Gomantak 

गोवा

कुठ्ठाळीच्या माजी आमदार एलिना साल्ढाणा यांची त्या ग्रामस्थांना भेट..

साल्ढाणा यांनी तेथील काही हॉटेल (Hotel) उद्योजक पर्यावरणाच्या (Environment) विरुद्ध जाऊन बांधकाम करण्याचा प्रयत्न करणार..

दैनिक गोमन्तक

वास्को (Vasco): आरोसी-कासावली गावात पर्यावरण नाशक प्रकल्प येत असल्याच्या विरोधात गावातील शेकडो नागरिकांनी रविवारी (दि.19) गोवा मुक्तिदिनाच्या 60 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून एक दिवसाचे उपोषण केले व सदर प्रकल्पाना तीव्र विरोध दर्शविण्यात आला. त्यात महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि मुलांचाही समावेश होता. आरोसी-कासावली गावातील नैसर्गिक जलकुंभ बुजवून हॉटेल उद्योजक बांधकाम करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या निषेधार्थ गोवा मुक्तिदिनादिवशी शेकडो ग्रामस्थ एका दिवसाच्या लाक्षणिक उपोषणास बसले. कुठ्ठाळीच्या माजी आमदार एलिना साल्ढाणा (Alina Saldanha) यांनी त्या ग्रामस्थांना भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला.

साल्ढाणा यांनी तेथील काही हॉटेल (Hotel) उद्योजक पर्यावरणाच्या (Environment) विरुद्ध जाऊन बांधकाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. असे केल्यास भविष्यात याचा त्रास गावाला आणि ग्रामस्थांना होणार असून गावाच्या हितासाठीच लोक रस्त्यावर उतरून उपोषणास बसले आहेत, असे साल्ढाणा म्हणाल्या. आम्ही येथील हॉटेल उद्योजकांच्या विरोधात नाहीत, ते त्यांच्याच जागेत बांधकाम करतील. मात्र, पर्यावरणाचे रक्षण करून त्यांनी बांधकाम करणे गरजेचे आहे. आरोसी कासावली गावात सातहून जास्त नैसर्गिक जलकुंभ जलस्रात असून पावसाळ्याचे पाणी त्यात साचल्यानंतर ते समुद्रात जाते.

या जलकुंभांचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे असून अन्यथा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी लोकांच्या घरात शिरून ग्रामस्थांना याचा त्रास निर्माण होणार आहे तसेच गावाला अन्य विविध समस्या सोसाव्या लागणार असल्याचे साल्ढाणा यांनी सांगितले, हॉटेल उद्योजकांनी जलकुंभांचे नुकसान न करता बांधकाम कशा प्रकारे करणार याची माहिती ग्रामस्थांना त्यांच्या

समितीला देणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे हित जपून पावले उचलल्यास नक्कीच ग्रामस्थ त्यांना विरोध करणार नाहीत, असे साल्ढाणा म्हणाल्या. गेल्या 10 वर्षांपासून ग्रामस्थ या विषयाबाबत आवाज उठवत आहेत. गाव आणि ग्रामस्थांच्या हितासाठी या लोकांनी केलेल्या विरोधाला माझा पाठिंबा असल्याचे साल्ढाणा (Alina Saldanha) म्हणाल्या. दरम्यान, एका ग्रामस्थाने जलकुंभाच्या विषयात काही काळापूर्वी अधिकाऱ्यांनी पाहणीवेळी ग्रामस्थांना विश्वासात घेतले नसल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात खळबळ! रोहित शर्मा पाकिस्तानचा कर्णधार? LIVE सामन्यात ब्रॉडकास्टरची मोठी चूक Watch Video

Crime News: क्रूरतेचा कळस! प्रेमात मिळाला धोका, संतापलेल्या प्रेयसीने ब्लेडने प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापला

ISL Football: जिगरबाज एफसी गोवाची बरोबरी, पिछाडीवरून गतविजेत्या मोहन बागानला 1-1 असे रोखले

Goa Virgal History: नौदल युद्ध ते गोधन रक्षण! वीरगळांवरील शिल्पांतून उलगडतो गोव्याचा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास

Sexual Harassment: 'इन्स्टाग्राम'वरून मैत्री करून युवतीला फसविणारा गजाआड, पोलिस कोठडीत रवानगी; तपास सुरू

SCROLL FOR NEXT