Margao municipal council Dainik Gomantak
गोवा

Margao News: ‘मडगावातील गैरप्रकारांबद्दल नागरिक तोंड उघडणार का?’ माजी नगराध्यक्षांचा संतप्त सवाल

Margao municipal council fraud: नगरपालिकेत वेगवेगळ्या प्रकरणात जो गैरप्रकार चालू आहे, त्या विरोधात मडगावचे नागरिक तोंड उघडणार का? असा प्रश्न माजी नगराध्यक्ष, शेडो कौन्सिलचे निमंत्रक व कॉंग्रेस नेते सावियो कुतिन्हो विचारत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao municipal council corruption

सासष्टी: मडगाव नगरपालिकेत वेगवेगळ्या प्रकरणात जो गैरप्रकार चालू आहे, त्या विरोधात मडगावचे नागरिक तोंड उघडणार का? असा प्रश्न माजी नगराध्यक्ष, शेडो कौन्सिलचे निमंत्रक व कॉंग्रेस नेते सावियो कुतिन्हो विचारत आहेत. गोव्यात चाललेला भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत एका बाजूने सांगत आहेत व त्यांच्याच पक्षाच्या हातात असलेली मडगाव नगरपालिका भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे, त्यावर कोणीही कारवाई करत नाही, असे सावियो कुतिन्हो यांचे म्हणणे आहे.

योगेश शेटकर या कारकुनाने फेस्त फेरीचे लाखो रुपये गिळंकृत केले आहेत. त्याला केवळ ‘मेमो’ देण्यापलिकडे त्याच्यावर कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही. शेटकर प्रकरणात नगरपालिका गंभीर नसल्याचेच स्पष्ट होत असल्याचेही कुतिन्हो याचे म्हणणे आहे.

नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी पत्रकारांना सांगितले आहे, की शेटकर यांना अटक करण्यास पोलिसांना सांगितले आहे. त्याच बरोबर नगरपालिकेने त्याच्याकडून येणे असलेले जवळ जवळ १४ लाख रुपये वसूल करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे.

मात्र नगरपालिका त्याच्याकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी टाळत आहे. काही लोकांच्या मते शेटकर यांना राजकीय संरक्षण मिळत आहे. नगरपालिका कायद्याप्रमाणे शेटकर यांना एव्हाना निलंबित करायला हवे होते. कुठल्याही परिस्थितीत त्याच्याकडून हे पैसे वसूल करुन घ्यायला हवे होते. यापूर्वी सोपो गोळा करणाऱ्या कंत्राटदाराकडूनही पैसे वसूल करून घेण्यास नगरपालिकेने तत्परता दाखवलेली नाही, असेही सावियो कुतिन्हो सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT