coach Mansoor Ali Khan
coach Mansoor Ali Khan Dainik Gomantak
गोवा

GCA: गोव्याच्या प्रशिक्षकपदी मन्सूर अली

दैनिक गोमन्तक

पणजी: कर्नाटकचे माजी वेगवान गोलंदाज प्रशिक्षक मन्सूर अली खान यांची गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) सीनियर संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. रणजी करंडक, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही प्रकारच्या स्पर्धेसाठी त्यांच्याकडे 2022-23 मोसमात गोव्याच्या संघाची जबाबदारी असेल.

(Former Karnataka fast bowler coach Mansoor Ali Khan appointed as head coach of Goa cricket team)

गोव्याच्या संभाव्य सीनियर संघाचे दिल्लीत सध्या शिबिर सुरू आहे. मन्सूर यांनी बुधवारी सूत्रे स्वीकारली, असे जीसीए सचिव विपुल फडके यांनी सांगितले. गोव्याच्या ज्युनियर संघाचे प्रशिक्षक राजेश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली संभाव्य संघ दिल्लीत सरावासाठी रवाना झाला होता. प्राप्त माहितीनुसार, कामत यांच्याकडे पूर्वीप्रमाणेच 19 वर्षांखालील संघाची धुरा असेल.

मन्सूर अली गोलंदाजी प्रशिक्षक असताना कर्नाटकने दोन वेळा रणजी करंडक जिंकला होता. गतमोसमातही ते गोव्याच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छुक होते, मात्र नंतर दिल्लीच्या के. भास्कर पिल्लई यांची निवड झाली होती. 50 वर्षीय मन्सूर अली यांनी भारताच्या अ संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक या नात्याने यापूर्वी काम पाहिले आहे.

‘‘आमच्या संघाची तयारी सध्या योग्य दिशेने आहे. तिन्ही प्रकारच्या स्पर्धेत आम्ही गतमोसमात चांगली कामगिरी केली, यंदा त्याहून सरस खेळ करण्याची उद्दिष्ट्य आहे. संभाव्य खेळाडूंनी पावसाळी सत्रात तंदुरुस्तीवर भर दिला. आगामी मोसमात कामगिरी उंचावण्यात त्याचा लाभ होण्याचा मला विश्वास आहे.

आमच्या नव्या प्रशिक्षकाचा अनुभव आणि खेळातील ज्ञान संघासाठी खूप सकारात्मक ठरेल,’’ असे विपुल यांनी मन्सूर अली यांच्या नियुक्तीची माहिती देताना सांगितले. सीनियर संघाचे सत्र नसेल, तेव्हा मन्सूर गोव्याच्या ज्युनियर खेळाडूंनाही मार्गदर्शन करतील, अशी माहिती जीसीए सचिवाने दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: कळंगुट येथे टॅक्सी चालकाला पर्यटकांकडून मारहाण

Bicholim Volleyball League : सर्वण येथे व्हॉलिबॉल लीगला सुरवात; आठ संघांचा सहभाग

Goa Traffic Violations: वाहतूक उल्लंघन ; चार महिन्यांत ९ कोटींचा दंड वसूल

Goa Rain Update : पावसाळ्यातील आव्हानांसाठी सज्ज राहा! संदीप जॅकीस यांच्या सूचना

Panaji News : सांतिनेज खाडीतील गाळउपसा पूर्णत्वाकडे; साडेतीन किलोमीटरच्या जलप्रवाहाला पुनरुज्जीवित करणार

SCROLL FOR NEXT