Asia Cup 2022 पूर्वी टीकाकारांवर संतापला विराट, 'मी चांगली फलंदाजी करतोय...'

Virat Kohli: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आगामी आशिया चषक 2022 क्रिकेट स्पर्धेत आपला गमावलेला फॉर्म पुन्हा मिळवण्यासाठी आशावादी आहे.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

Team India: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आगामी आशिया चषक 2022 स्पर्धेत आपला गमावलेला फॉर्म पुन्हा मिळवण्यासाठी आशावादी आहे. कोहली तब्बल दीड महिन्यानंतर मैदानावर परतणार आहे. भारताला या स्पर्धेतील पहिला सामना 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळायचा असून या सामन्यात सर्वांच्या नजरा कोहलीच्या फलंदाजीकडे असतील. हा सामना विराटच्या कारकिर्दीतील 100 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना असेल. कोहलीने 1000 दिवसांपेक्षा जास्त काळ शतक झळकावलेले नाही. त्याने शेवटचा सामना इंग्लंड दौऱ्यावर खेळला, जिथे त्याची सर्वोच्च धावसंख्या 20 होती.

दरम्यान, 33 वर्षीय विराटने गेल्या सुमारे तीन वर्षांपासून सुरु असलेल्या खराब फॉर्मवर आपले मौन सोडले आहे. विराटने इंग्लंडमध्ये (England) झालेल्या चुका मान्य केल्या आहेत. त्याने म्हटले की, 'खराब फॉर्मचे एक कारण एकसमान पॅटर्न आहे आणि तो सुधारण्यासाठी मी कठोर परिश्रम केले आहे.'

Virat Kohli
Asia Cup Qualifier: आज होणार निर्णय, यापैकी एक संघ टीम इंडियाशी भिडणार

दुसरीकडे, स्टार स्पोर्ट्सच्या गेम प्लॅन शोमध्ये विराट म्हणाला, "इंग्लंडमध्ये जे घडले तो एक पॅटर्न होता, ते असे काहीतरी होते, ज्यावर मी आता काम करु शकलो. परंतु सध्या आपण काहीही करु शकत नाही असे होत नाही "

Virat Kohli
Asia Cup 2022 पूर्वी वसीम अक्रमने सांगितली पाक संघाची कमजोरी

तसेच, खराब फॉर्ममुळे कोहलीला तज्ञांच्या टीकेला सामोरे जावे लागत होते. मात्र आता विराटने या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. तो म्हणाला, “माझा खेळ कोणत्या स्तरावर आहे, हे मला माहीती आहे. प्रतिकूलतेचा सामना करण्याची आणि विविध प्रकारच्या गोलंदाजीचा सामना करण्याची क्षमता असल्याशिवाय तुमची दीर्घ आंतरराष्ट्रीय कारकीर्द होऊ शकत नाही.”

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com