Shashi Tharoor In Goa Dainik Gomantak
गोवा

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Shashi Tharoor In Goa: शशी थरुर गोव्यात दाखल झाले असून, पुढील काही दिवस ते गोव्यातील उमेदवारांच्या प्रचारात भाग घेताना दिसतील.

Pramod Yadav

Shashi Tharoor In Goa

लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्का बसणार, चारशे नव्हे यावेळी त्यांना दोनशे जागांचा टप्पा पार करने देखील जड जाणार, असे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शशी थरुर म्हणाले.

काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी थरुर गोव्यात दाखल झाले आहेत. दाबोळी विमानतळावर दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी इंडिया आघाडीबाबत देशात सकारात्मक वातावरण असल्याचे सांगितले.

गोव्यात दोन लोकसभा जागांसाठी येत्या सात तारखेला मतदान होणार आहे. प्रचार अंतिम टप्प्यात असताना काँग्रेस आणि भाजपचे मोठे नेते प्रचारासाठी राज्यात दाखल होत आहेत. शशी पुढील काही दिवस गोव्यात रमाकांत खलप आणि विरियातो फर्नांडिस यांच्यासाठी प्रचार करताना दिसतील.

केंद्रातील भाजप सरकाला नागरिक त्रस्त झाल्याचे दिसत आहे. मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यात भाजप विरोधातील नाराजी दिसून येत आहे.

देशात इंडिया आघाडीबाबत सकारात्मक वातावरण असल्याचे देखील थरुर यावेळी म्हणाले. या निवडणुकीत भाजपला धक्का बसेल, यावेळी त्यांना 400, 300 नव्हे 200 जागांचा टप्पा पार करने देखील कठीण जाईल, असे थरुर म्हणाले.

थरुर म्हणाले येत्या काळात आणखी चित्र स्पष्ट होत जाईल, सध्या देशभरात चांगल्या पद्धतीने प्रचार सुरु असून, लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दोन टप्प्यातील मतदानात समोर आलेल्या माहितीनुसार, भाजपला धक्का बसणार असे दिसतंय, असे थरुर म्हणाले.

भाजपने ज्योतिषी बदलावा

भाजपने पुढील पन्नास वर्षे काँग्रेस सत्तेत येणार नाही तसेच, राहुल गांधी पंतप्रधान होणार नाहीत, असा प्रश्न विचारला असता, थरुर यांनी भाजपने ज्योतिषी बदलावा असा सल्ला दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT