Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Goa Congress: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभवाची भीती वाटत असल्याचे पवन खेरा यांचे वक्तव्य.
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak

Goa Congress

भाजपने दक्षिण गोव्यात भांडवलदार उमेदवार उभा केला आहे, जो मोदी आणि त्यांच्या मित्रांच्या हितासाठी काम करेल. भाजप सरकार भांडवलदार मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यातील जमिनीचे रुपांतर करत आहे, असा आरोप काँग्रेसचे मीडिया प्रभारी पवन खेरा यांनी केला.

पवन खेरा यांनी गुरुवारी काँग्रेस हाऊस मध्ये पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर, एआयसीसी मीडिया प्रभारी हर्षद शर्मा, उपाध्यक्ष सुनील कवठणकर आणि मीडिया प्रमुख अमरनाथ पणजीकर उपस्थित होते.

भाजप सरकार भांडवलदार मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यातील जमिनीचे रुपांतर करत आहे. त्यांनी आपल्या मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यातील मोठ्या जमिनीचे रूपांतर केले, असा आरोप पवन खेरा यांनी केला.

गोव्याचा निसर्ग नष्ट करण्यापासून रोखले पाहिजे. आम्ही पर्यावरण संतुलन आणि गोव्याची जैवविविधता आणि तिची ओळख यांचे संरक्षण करू, असे आश्वासन देखील खेरा यांनी यावेळी दिले.

मोदी गोव्याला कोल हब बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचा लोकांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे, असे मत खेरा यांनी कोळसा वाहतुकीबाबत बोलताना मांडले. गोवा हे भारताचे भूषण आहे. गोव्याचे कोळशात रूपांतर करायचे आहे का? असा सवाल त्यांनी केला.

Goa Congress
Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

पक्षांतर करून मतदारांचा विश्वासघात करणारे आमदारांना अडवण्यासाठी पक्षांतरविरोधी कायदा अधिक मजबूत करण्याची गरज खेरा यांनी व्यक्त केली.

भाजपने आमदार आयात करून आणि विरोधकांना कमकुवत करून लोकशाहीची चेष्टा केलीय. त्यामुळे आम्ही पक्षांतर विरोधी कायदा मजबूत करणार आहोत. अशा प्रकारे निवडून आलेले आमदारांना पक्ष बदलल्यानंतर त्यांना अपात्र ठरवले जाईल. एकदा हे झाले की, पक्षांतरांना प्रोत्साहन देऊन स्थापन झालेल्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार राहणार नाही, असेही खेरा म्हणाले.

पक्षांतरविरोधी कायदा मजबूत झाल्यावर कोणीही पक्ष बदलण्याचा विचार करणार नाही, असे ते म्हणाले.

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा हा लैंगिक छळात गुंतलेला असून एसआयटी स्थापन झाल्यानंतर तो जर्मनीला पळून गेल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचे 2900 अश्लील व्हिडिओ आहेत. हा जगातील सर्वात मोठा लैंगिक गुन्हा आहे. पंतप्रधान मोदींना त्यांच्या गुन्ह्यांची माहिती असूनही त्यांनी त्यांचा प्रचार केला. सत्ता मिळविण्यासाठी भाजप एवढ्या खालच्या पातळीवर गेले हे अस्वीकार्य आहे, असेही खेरा म्हणाले.

काँग्रेसचे सरकार आल्यावर सरकारी खात्यातील 30 लाख नोकऱ्या भरल्या जातील. आम्ही या देशातील पीडित प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. शेतकरी आत्महत्या करत आहेत, महिलांवर गुन्हे घडत आहेत. आम्हाला ते थांबवायचे आहेत, असे खेरा म्हणाले.

भाजपने दक्षिण गोव्यात भांडवलदार उमेदवार उभा केला आहे, जो मोदी आणि त्यांच्या मित्रांच्या हितासाठी काम करेल, अशी टीका खेरा यांनी केली.

मोदी संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून त्यांनी 400 पारचा नारा दिला आहे, असेही खेरा म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com