Karmal Ghat Dainik Gomantak
गोवा

Karmal Ghat : करमल घाट रस्त्याच्या रुंदीकरणास वन खात्याची आडकाठी; सभापती तवडकरांचे खडे बोल

पुढील सहा महिन्यात घाटातील रुंदीकरणाचे काम सुरू केले जाईल, असंही काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तडवडकर यांनी स्पष्ट केलं.

गोमन्तक डिजिटल टीम

Karmal Ghat : करमल घाटातील रस्ता अरुंद असल्याने या रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. तसेच अरुंद रस्त्यामुळे घाटातील अनेक ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र वळणेही आहेत. त्यामुळे प्राधान्याने ही अपघातप्रवण क्षेत्र असलेली वळणे वन खात्याची परवानगी घेऊन काढली जाणार आहे, अशी माहिती विधानसभा सभापती रमेश तवडकर यांनी दिली आहे. रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी वन खात्याचा अडथळा आहे. या खात्याकडून तीन महिन्यात ना हरकत दाखला मिळाल्यास पुढील सहा महिन्यात घाटातील रुंदीकरणाचे काम सुरू केले जाईल, असंही काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तडवडकर यांनी स्पष्ट केलं.

करमल घाटात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढत आहे. या रस्‍त्यावरून अवजड वाहने धावत असल्याने अरुंद रस्त्याच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. ही कोंडीची समस्या सुटावी असे केवळ काणकोणवासीयच नाही तसेच सरकारलाही वाटते. या रस्त्याच्या कामाच्या प्रक्रियेत गोवा सरकार काहीसे मागे पडले आहे. हल्लीच केंद्रीय वाहतूक तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी प्राथमिक टप्प्यात रस्त्याच्या कामासाठी मान्यता दिली आहे. मात्र अडचण आहे ती वन खात्याकडून या कामासाठी परवाना मिळण्याची. ही परवानगी मिळाल्यास रुंदीकरणाच्या कामाला गती येईल तसेच होणारी वाहतुकीची कोंडी व रस्ता अपघातावर नियंत्रण येणार आहे, असं तवडकरांनी स्पष्ट केलं आहे.

करमल घाटात अनेक वळणे असल्याने आणि अरुंद रस्ता ही वाहतुकीच्या कोंडीची मूळ कारणे आहेत. जोपर्यंत ही वळणे असलेला डोंगराळ भाग कापून रस्ता रुंद केला जात नाही तोपर्यंत ही समस्या अशीच राहणार आहे. राज्य सरकार या रस्त्यासाठी सर्व ते प्रयत्न करत आहे. केंद्राकडेही पाठपुरावा करत आहे. घाटातील रस्ता रुंद झाल्यावर वाहतुकीची कोंडी कायमची सुटेल, असे मत तवडकर यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘जंगलातून बाहेर पडा, अन्यथा कारवाई करू’, कर्नाटकातील काळी व्याघ्र प्रकल्पासाठी 630 कुटुंबांचे स्थलांतर, केवळ 15 लाखांची भरपाई

Kurnool Bus Fire: खासगी बस आगीत जळून खाक, 20 प्रवाशांचा मृत्य़ू झाल्याची भीती, अनेकजण जखमी; धडकी भरवणारा Video, Photo समोर

Goa Elephant News: गोव्याच्या सीमेवर 10 हत्ती! सत्तरीतून घुसण्याचा धोका; वन खाते हवालदिल, नागरिकांत घबराट

Margao: मद्यधुंद तरुणाला बेदम मारहाण! गंभीर अवस्थेत उपचारासाठी गोमेकॉत दाखल; 'त्या' पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता

दोन अग्निवीर जवानांचा गोव्यात मृत्यू, दुचाकी अपघातात गमावले प्राण

SCROLL FOR NEXT