waterholes dainikgomantak
गोवा

गोवा : वनविभागाकडून मानवनिर्मित पाणवठे भरण्याचे काम सुरू

वनविभाकडून वनक्षेत्रातील मानवनिर्मित पाणवठे भरण्याचे काम सुरू

दैनिक गोमन्तक

पणजी : नुकताच फेब्रुवारी महिना संपला असून मार्चचा पहिल्या आठवड्याचा शेवट सुरू आहे. काही ठिकाणी वातावरण थंड तर काही ठिकाणी अंगाला घाम फोटणाऱ्या उकाड्याला लोक सामोरे जात आहेत. राज्यातही तापमानात वाढ होत असून सर्वसामान्यांना उन्हाच्या (summer) झळा बसत आहेत. अशीच स्थिती वन्यप्राण्यांची (wild animals) ही आहे. त्यामुळे बदलत्या स्थितीकडे पाहत राज्यातील वनविभाग ही सक्रीय झाला असून वनविभागाकडून मानवनिर्मित पाणवठे भरण्याचे काम सुरू झाले आहे. (forest department has initiated the annual task of refilling)

राज्यात उन्हाळा (summer) सुरू होताच तापमान (Temperature) वाढत जाते. तर उत्तर आणि दक्षिण गोव्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ होऊन तापमान हे ३५ अंशाच्या पार जाते. त्यामुळे वनक्षेत्रातील वन्य प्राणी तहान भागविण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या शोधात नैसर्गिक अधिवास सोडून बाहेर पडण्याची शक्यता असते. ही शक्यता लक्षात घेऊन गोवा वनविभागाने (Forest Department) राज्यातील वनक्षेत्रातील मानवनिर्मित पाणवठे (manmade waterholes) पुन्हा भरण्याचे काम सुरू केले आहे.

जागतिक वन्यजीव दिनानिमित्त तसेच वाघांचे संरक्षण योजना राज्य योजना 2021-22 अंतर्गत जलकुंभांच्या व्यवस्थापनासाठी भगवान महावीर अभयारण्य (Bhagwan Mahaveer Sanctuary) आणि मोलेम राष्ट्रीय उद्यान (Mollem National Park), म्हादेई वन्यजीव अभयारण्य (Mhadei Wildlife Sanctuary) आणि नेत्रावली वन्यजीव अभयारण्य (Netravali Wildlife Sanctuary) या संरक्षित भागात तीन मिनी पाण्याचे टँकर तैनात करण्यात आले आहेत.

प्रत्येक टँकरमध्ये (Water Tankers) 1,000 लिटर पाणी असते. जे त्यांच्या क्षमतेनुसार मानवनिर्मित जलकुंभांना पुन्हा भरण्यासाठी वापरले जाते, असे मुख्य वनसंरक्षक संतोष कुमार यांनी सांगितले.

जलकुंभ हे वन्य प्राण्यांसाठी एक महत्त्वाचा अधिवासाचा घटक आहे. ते अनेक प्रजातींसाठी पाणी पुरवतात तसेच अनेक उभयचरांसाठी प्रजनन निवासस्थान म्हणूनही काम करतात. ते स्थानिक परिसंस्थेसाठी (ecosystem) महत्त्वपूर्ण आहेत. तर वन्यजीवांच्या हालचालींचा केंद्रबिंदू बनत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गोवा सरकारचा मोठा निर्णय; चार कनिष्ठ अधिकाऱ्यांची सेवा केली समाप्त!

Hong Kong Fire Video: हाँगकाँगमध्ये भीषण आग! 65 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

SCROLL FOR NEXT