Goa Airline Service: सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगभर जागतिक तणाव निर्माण झाला आहे. याचा सर्वच गोष्टींवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या परिणाम होत आहे. गोव्यातील अनेक विद्यार्थी शिक्षणानिमित्त युक्रेनमध्ये अडकले होते. या एकंदरीत परिस्थितीचा गोव्यातील विमानसेवेवर होण्याची दाट शक्यता होती. मात्र यासंदर्भात विमानतळ संचालक गगन मलिक यांनी प्रकाश टाकला आहे.
ते म्हणाले की, रशिया-युक्रेन संघर्षाच्या दरम्यान राज्यातील पर्यटनासाठीच्या विमान वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही कारण रशियाकडून चार्टर विमाने (Charter flights In Goa) वेळापत्रकानुसार सुरू असून आंतरराष्ट्रीय पर्यटक राज्यात येत आहेत. कोणतीही विमाने रद्द करण्यात आलेली नाहीत आणि रशिया आणि गोवा दरम्यान मंजूर स्लॉटनुसार 'रोसिया एअरलाइन्स' (Rossiya Airlines) कार्यरत आहेत. एक चार्टर्ड फ्लाइट सुमारे 506 प्रवाशांसह आली आणि 489 प्रवाशांना घेऊन गेली. (Russia Ukraine war has no effect on Goa tourism Gagan Malik)
आतापर्यंत रोसिया एअरलाइन्सच्या चार्टर फ्लाइटने कोणतेही स्लॉट रद्द केलेले नाहीत आणि रशिया-युक्रेन संघर्षाच्या दरम्यान राज्याच्या पर्यटनावर (Goa Tourism) कोणताही परिणाम झालेला नाही. कझाकस्तानमधून येणाऱ्या चार्टर फ्लाइट्स देखील सुरू आहेत.
विमानतळ संचालक म्हणाले की, रशियाचे चार्टर्स विमान नऊ दिवसांतून एकदा कार्यरत आहेत, त्यांनी नऊ स्लॉट घेतले आहेत आणि सात स्लॉट वापरले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.