Goa Cocaine, Mapusa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: कोकेन विक्रीप्रकरणी युगांडाच्या दोन विद्यार्थ्यांना अटक! संशयित पुण्याहून बसमार्गे म्हापशात

Goa Drugs: सेंतामू एल्विस (२९) व उमर लुक्वागो (२७) अशी संशयितांची नावे आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: कोकेनची विक्री करण्यासाठी गोव्यात आलेल्या युगांडामधील दोन विद्यार्थ्यांना म्हापसा पोलिसांनी येथील नवीन केटीसी बसस्थानकावर पकडले. हे संशयित पुण्याहून बसमार्गे म्हापशात आले होते.

सेंतामू एल्विस (२९) व उमर लुक्वागो (२७) अशी संशयितांची नावे आहेत. दरम्यान, शिक्षण घेण्याच्या हेतूने ते देशात येऊन अमलीपदार्थांची तस्करी करायचे. त्यांच्याकडे विद्यार्थी व्हिसा आहे, असे प्रथमदर्शनी पोलिस तपासात समोर आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही कारवाई शुक्रवारी (ता. १६) रात्री उशिरा केली. संशयित हे बसमार्गे पुण्याहून गोव्यात (म्हापशात) ड्रग्सचा व्यवहार करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघाही संशयितांना म्हापसा नवीन केटीसी बसस्थानकावर पकडले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याजवळ कोकेन सापडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ..हेच खरे गोमंतकीय! 75 वर्षांचे आजोबा बघताबघता चढताहेत झाडावर; गोव्याचे 'बाप्पा' होताहेत सोशल मीडियावर हिट

Goa Food Poisoning: बागा समुद्रकिनाऱ्यावर इडली-सांभार खाणं बेतलं जिवावर! केरळच्या 16 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

Crime News: इव्हेंटच्या कामासाठी बोलावलं अन् वासनेची शिकार बनवलं! मुंबईच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; राजस्थान पुन्हा हादरलं

अंमली पदार्थांच्या काळ्या पैशावर ED आणि NCB ची सर्जिकल स्ट्राईक! गोव्यासह 7 राज्यांतील 25 ठिकाणी छापेमारी; कोट्यवधींची रोकड जप्त

Mauni Amavasya 2026: मौनी अमावस्येला ग्रहांचा राजा आणि मनाचा स्वामी एकत्र, 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; उजळणार नशीब

SCROLL FOR NEXT