Goa Tourism Report Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: ..दरवर्षी गोव्यात येणारे विदेशी पर्यटक 'श्रीलंके'कडे गेले; का होतेय संख्या कमी? व्यावसायिकांनी सांगितली कारणे

Goa Tourist Decline: गेल्या वर्षी शॅक वितरण उशिरा केल्याने विदेशी पर्यटक अन्य देशांकडे वळले होते व या शॅक व्यावसायिकांना मोठे नुकसान सोसावे लागले होते.

Sameer Panditrao

फातोर्डा: गेल्या वर्षा जानेवारीत दक्षिण गोव्यात काही प्रमाणात विदेशी पर्यटकांची रेलचेल किनारी परिसरात दिसत होती. यंदा मात्र काही तुरळक विदेशी पर्यटक आले असल्याचे सांगून व्यवसाय ठप्प झाल्याची माहिती येथील किनारी भागातील व्यावसायिकांनी दिली.

तसेच यंदा पर्यटन खात्याने शॅक वितरण वेळेवर केलेले आहे. गेल्या वर्षी शॅक वितरण उशिरा केल्याने विदेशी पर्यटक अन्य देशांकडे वळले होते व या शॅक व्यावसायिकांना मोठे नुकसान सोसावे लागले होते.

गोव्यातील समुद्र किनारे हे विदेशी पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. विशेषतः दक्षिण गोव्यातील कोलवा, केळशी, वार्का, मोबोर, पाळोळे समुद्र किनारे विदेशी पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत. या पर्यटक हंगामाचे आणखी तीन महिने बाकी राहिले आहेत.

देशी पर्यटक येत असले तरी त्यांच्याकडून हव्या त्या प्रमाणात या शॅक मालकांना व्यवसाय लाभ होत नाही, अशी माहिती अखिल गोवा शॅक असोसिएशनचे अध्‍यक्ष क्रूझ कार्दोज यांनी दिली.

कार्दोज म्हणाले की, विदेशी पर्यटक अन्य देशाकडे वळण्यास अन्य कारणेही आहेत विमानाचा, वास्तव्याचा वाढलेला दर, किनारी भागात होत असलेल्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे विदेशी पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवल्याचा फटकाही आम्हाला बसत आहे. क्रूझ हे दरवर्षी केळशी येथे पर्यटक हंगामात शॅक्स चालवित आहेत.

पर्यटक श्रीलंकेकडे !

बेताळभाटी येथील शॅक्‍स व्‍यावसायिक इनास मारियानो फर्नांडिस यांनी सांगितले की, गोव्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांना विमानाचे दर परवडत नाहीत, तसेच हॉटेलचे भाडेही महाग झालेले आहे. दरवर्षी आपल्या शॅक्समध्ये येणारे १५ विदेशी पर्यटक श्रीलंकेकडे गेले आहेत. त्या पर्यटकांनी आपल्याशी संपर्क साधून गोव्यातील रुम भाडे, विमानाचे वाढलेले दर हे आम्हाला परवडत नसल्याचे सांगितले, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT