CM Pramod Sawant, Goa Assembly Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2024: बेकायदा बोअरवेल, पाणी चोरी करणाऱ्यास १० लाखांपर्यंत दंड; मुख्यमंत्री सावंत

गोमन्तक डिजिटल टीम

पाईपलाईनमधून पाण्याची बेकायदेशीर चोरी करणे, बेकायदेशीर बोअरवेल खोदणे यास १० लाख रुपयांपर्यंत मोठा दंड ठोठावला जाणार आहे. मोठ्या प्रकल्पांना परवानगी देण्यापूर्वी या भागातील पाणीपुरवठ्याची उपलब्धता तपासली जाईल, असे डॉ. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अधिवेशनात सांगितले.

बुधवारी ‘कॉलिंग अटेन्शन’ सदरात अधिवेशनात फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई आणि कार्लुस फेरेरा यांनी राज्यातील तीव्र पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला होता. संपूर्ण गोव्याला २४ तास पाणीपुरवठा करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत विरोधी आमदारांनी पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

मडगाव आमदार दिगंबर कामत यांनी नमूद केले की, सुरुवातीच्या काळात लोक नैसर्गिक गोड्या पाण्याच्या स्त्रोतांचे पाणी वापरत होते, जे आज दुर्लक्षित झाले आहे. लोक पूर्णपणे नळाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. लोकांनी पाणी काटकसरीने वापरावे. अन्‍य आमदारांनीही पाणीटंचाईचा विषय उपस्‍थित केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fatal Accident at Mandrem: मांद्रे येथे भीषण अपघातात २ मुलींनी गमावला जीव; ट्र्कचालक पोलिसांच्या ताब्यात

Goa Crime: फ्लॅट देण्याचे आश्वासन, होंडा सत्तरीत महिलेची 26 लाखांची फसवणूक

Robbery at Mapusa: SBI कर्मचारी म्हणत घातला 2.36 लाखांचा गंडा, अज्ञाताचा शोध सुरू..

Goa Eco Sensitive Zone: आम्ही करायचे काय..? म्हाऊस ग्रामसभेत अतिसंवेदनशील क्षेत्राला विरोध

'Heritage Master Plan तयार करा अन्यथा..'; जुने गोवे वाचवण्यासाठी सेव्ह ओल्ड गोवा ॲक्शन समितीचा पुढाकार

SCROLL FOR NEXT