Food Civil Supplies | Turdal Dainik Gomantak
गोवा

Food Civil Supplies: तुरडाळ नासाडीची चौकशी अंतिम टप्प्यात!

Food Civil Supplies: नागरी पुरवठा खात्यातील गोदामामध्ये नासाडी झालेल्या तुरडाळीची माहिती एक वर्षापूर्वी उघड झाली होती.

दैनिक गोमन्तक

Food Civil Supplies: नागरी पुरवठा खात्यातील गोदामामध्ये नासाडी झालेल्या तुरडाळीची माहिती एक वर्षापूर्वी उघड झाली होती. ही तुरडाळ खरेदी करण्यासाठी वित्त खात्याची व मंत्रिमंडळाची मान्यता नसताना ती आणण्यात आली होती. तुरडाळीच्या नासाडीमुळे झालेल्या नुकसानीला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांकडून ते वसूल करण्याचा शेरा वित्त खात्याने मारला होता.

नागरी पुरवठा खात्याच्या सचिवांनी केलेल्या नोंदणीची दखल योग्यवेळी घेण्यात आली असती, तर सरकारला मोठे नुकसान सोसावे लागले नसते. मात्र, यामध्ये झालेल्या निष्काळजीपणाची चौकशी दक्षता खात्यामार्फत सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे.

गेल्यावर्षी जानेवारीमध्ये गोदामात पडून असलेल्या तुरडाळीची नासाडी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याच्या विल्हेवाटीसंदर्भातची माहिती नागरी पुरवठा खात्याच्या सचिवांना पाठवण्यात आली होती. त्यावर त्यांनी खात्याकडे काही गोष्टींवर स्पष्टीकरण मागितले होते त्याला उत्तर देऊन पुन्हा 13 जानेवारीला सचिवांकडे पाठवले होते. त्यातून अनेक बाबी समोर आल्या होत्या.

दरम्यान, काही स्वस्त धान्य दुकानधारकांनी तुरडाळीची पोती ठेवण्यास जागा नसल्याने व काहींनी पैशांच्या चणचणीमुळे ही तुरडाळ उचलली नाही. 145 टन तुरडाळ स्वस्त धान्य दुकानधारकांनी उचलली, त्यातील 10 टन संपली.

त्यामुळे तुरडाळीला मागणी होती का व ती खपवण्यासाठी काय प्रयत्न करण्यात आले यावर पुन्हा स्पष्टीकरण सचिवांनी मागितले. त्यांनी यासंदर्भातचा योग्य निर्णय घेण्याचा शेरा मारून ती फाईल मंत्र्याकडे पाठविली. मंत्र्यानी त्यातील काही ठराविक मजकुरावर ‘एक्स’ अशा खुणा करून खात्याकडे पाठविली.

नागरी पुरवठा खात्याने खरेदी केलेल्या तुरडाळीच्या मान्यतेसाठी फाईल वित्त खात्याकडे पाठवण्यात आली होती. या खात्याने केलेले नियोजन व्यवस्थित नव्हते व गरजेपेक्षा जास्त तुरडाळ खरेदी केल्याने सुमारे 1.90 कोटींचे नुकसान झाले असा निष्कर्ष वित्त खात्याने काढला होता.

तुरडाळ खरेदी करण्यापूर्वी वित्त खात्याने केलेली निरीक्षणे विचारात घेण्यात आली नव्हती. या खरेदीला मान्यता नसतानाच ती करण्यात आली होती. त्यामुळे संबंधितांना जबाबदार धरून चौकशी करण्याची शिफारस केली होती. या प्रकरणात काही अधिकारी गुंतलेले असल्याने त्याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी दक्षता खात्याकडे दिली आहे.

दोषींवर होणार शिस्तभंगाची कारवाई

या प्रकरणाची चौकशी दक्षता खात्यामार्फत सुरू आहे. नागरी पुरवठा खात्याच्या निलंबित संचालकांसह आठ कर्मचाऱ्यांनी तुरडाळ साठ्यासंदर्भातची फाईल हाताळण्याची भूमिका याची तपासणी करण्यात येत आहे. ही चौकशी अंतिम टप्प्यात आहे.

या प्रकरणात दोषी आढळून येणाऱ्या राजपत्रित अधिकाऱ्यांविरुद्धच्या चौकशीसाठी मुख्य सचिवांकडे शिफारस केली जाणार आहे, तर बिगर राजपत्रित कर्मचाऱ्यांची चौकशी खात्यामार्फत केली जाईल. या चौकशीअंती झालेल्या नुकसानीला जबाबदार असलेल्या कर्मचारी वा अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाईचा निर्णय सरकार घेईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT