Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Goa FDA Raid: लोकांच्या आरोग्याशी खेळ नको! आरोग्‍यमंत्री राणे कडाडले; ‘एफडीए’ची कारवाई राहणार सुरू

Vishwajit Rane: अन्नपदार्थांमध्ये भेसळ आढळून आली आहे. आरोग्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची हयगय सहन करणार नाही. अधिकाऱ्यांमार्फत ही कारवाई चालूच राहणार आहे, असेही राणे म्हणाले.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात अन्न आणि औषध प्रशासनाच्यावतीने छापे तसेच कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई अशीच सुरूच राहणार आहे. बनावट रंग तसेच भेसळयुक्त खाद्यपदार्थांद्वारे होणारा आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही, असा कडक इशारा आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी आज दिला.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून विविध आस्थापने तसेच हॉटेल्स, रेस्टॉरंटस् वर छापे टाकले जात आहेत. या छाप्यांमध्ये अन्नपदार्थांमध्ये भेसळ आढळून आली आहे. आरोग्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची हयगय सहन करणार नाही. अधिकाऱ्यांमार्फत ही कारवाई चालूच राहणार आहे, असेही राणे म्हणाले.

मला अंधारात ठेवून बोंडला प्राणीसंग्रहालय बंद

बोंडला प्राणीसंग्रहालय बंद करण्यात आले. मात्र, याबाबत वनमंत्री म्हणून मला कोणतीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली नाही, ही अतिशय गंभीर बाब असून संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिला आहे. याबद्दल संबंधित अधिकाऱ्याने स्पष्टीकरण द्यावे, लवकरच यासंदर्भात आढावा बैठक घेतली जाईल, असेही ते म्हणाले.

पाच प्राण्यांचा मृत्यू!

बोंडला वन्यजीव अभयारण्य प्राणीसंग्रहालयातील तीन ताडमांजर आणि दोन जंगली मांजरे अज्ञात विषाणूच्या संसर्गामुळे मरण पावल्यानंतर प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी १ एप्रिलपासून तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे. प्राण्यांच्या मृत्यूमुळे वन विभागाने तातडीने पावले उचलली असून मृत प्राण्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत, जेणेकरून या आजाराचे नेमके कारण समजू शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics : ''डबल इंजिन'चे आश्वासन Fail!आता जनताच भाजपला धडा शिकवेल; माणिकराव ठाकरे-अमित पाटकरांचा घणाघात

Goa Crime: वाळपई हादरली! 41 वर्षीय महिलेचे अपहरण करुन जंगलात लैंगिक अत्याचार; अज्ञात नराधमांविरोधात गुन्हा दाखल

IPL 2026 Auction: गोव्याचे क्रिकेटपटू 'आयपीएल' लिलावात पसंतीविना; सुयश प्रभुदेसाई, अभिनव तेजराणा व आणि ललित यादव Unsold

Drishti Marine: समुद्रात बुडणाऱ्या चौघांना जीवरक्षकांकडून जीवदान, दृष्टी मरीनची कामगिरी; दोन बेपत्ता मुलांना काढले शोधून

Goa News Live: लुथरा बंधूंच्या अटकेवर मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचे मौन

SCROLL FOR NEXT