FDA Dainik Gomantak
गोवा

FDA Raid: नावेलीत ‘एफडीए’ची कारवाई; कालबाह्य झालेल्या साठ्याची विल्‍हेवाट

Goa FDA: ‘एफएसएसएआय २००६’ आणि त्‍याखालील नियमांचे पालन होत आहे की नाही याची तपासणी करण्‍यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मोहीम राबविली

गोमन्तक डिजिटल टीम

Goa FDA Raid

मडगाव: सासष्‍टीत गुरुवारी ‘एफएसएसएआय २००६’ आणि त्‍याखालील नियमांचे पालन होत आहे की नाही याची तपासणी करण्‍यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मोहीम राबविली. यावेळी मांडोप-नावेली येथील एका आवारात सुमारे १५ किलो मिश्र शेव इत्‍यादी फरसाणाचा अंदाजे ३८०० रुपये किमतीचा साठा ‘एफएसएसएआय’ मार्गदर्शक तत्त्वांनुसार योग्‍य लेबलशिवाय आढळला.

तसेच कालबाह्य झालेला गोड हलवा अंदाजे २० किलो सापडला. त्‍याची साठवण योग्‍यप्रकारे केली नव्‍हती आणि त्‍याची किंमत अंदाजे ५६०० रुपये इतकी हाेती. या सर्व साठ्यांची सार्वजनिक आरोग्‍याच्‍या हितासाठी नंतर विल्‍हेवाट लावण्‍यात आली.

या मोहिमेत वरिष्‍ठ अन्न सुरक्षा अधिकारी प्रिया देसाई, अमित मांद्रेकर, स्‍नेहा नाईक, अभिषेक नाईक यांचा समावेश होता. संचालक श्‍वेता देसाई व अधिकारी संज्‍योत कुडाळकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्‍यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT