Agriculture  Dainik Gomantak
गोवा

Fonda: पदवीधरांना ‘मशरूम’ लागवडीचे प्रशिक्षण

गोवा गौड समाज संस्थेतर्फे हरित क्रांती उपक्रम विभागीय शेतकी खाते, फोंडातर्फे युवा शेतकऱ्यांसाठी मशरूम लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले.

दैनिक गोमन्तक

Fonda: गोवा गौड समाज संस्थेतर्फे हरित क्रांती उपक्रम विभागीय शेतकी खाते, फोंडातर्फे युवा शेतकऱ्यांसाठी मशरूम लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले. गोवा गौड समाज एक समुदाय विकास आणि युवा सक्षमीकरण संस्थेने फोंडा तालुक्यातील 20 तरुण पदवीधरांना मशरूम लागवडीवर भोम येथील सत्यम सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले.

प्रणिता फळदेसाई -साहाय्यक कृषी अधिकारी फोंडा आणि सहप्रशिक्षक चांदनी सातारकर यांनी युवा शेतकऱ्यांना ऑयस्टर मशरूमची लागवड प्रक्रिया, टप्प्याटप्प्याने वाढीचे निरीक्षण यावर मार्गदर्शन केले.

पोषण प्रक्रिया, कापणी, पॅकेजिंग, अन्न साखळी पुरवठ्यासाठी ब्रँडिंग आणि विपणवर माहिती देण्यात आली. प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या घरामागील अंगण आणि स्टोअर रूममध्ये सहाय्यक वातावरण तयार करून स्वतःची शेती सुरू करण्यासाठी प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.

कृषी पार्श्वभूमी आणि समुदायातील वंशपरंपरागत कौशल्ये असलेले युवक सरकारच्या अनुषंगाने कृषी उत्पादनांच्या उत्पादन आणि विपणनासाठी एक व्यवहार्य इको-सिस्टम विकसित करू शकतात, यावर मार्गदर्शन केले.

फळदेसाई यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली. गोवा गौड समाजचे अध्यक्ष घनःश्याम भोमकर यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक तुकाराम गावडे यांनी आभार मानले. प्रमोद भोमकर यांनी सूत्रसंचालन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: राज्यात पावसानं पुन्हा उडवली दाणादाण, पर्वरीत वाहनधारकांची त्रेधातिरपिट; चिखलामुळे वाहतूक कोंडी!

Goa Live Updates: वाळपईत पावसाचं धूमशान

Rashi Bhavishya 15 November 2024: आरोग्यात सुधारणा होईल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती कराल; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Cash For Job Scam: 'सोमवारपर्यंत चौकशी आयोग नेमा अन्यथा...'; कॅश फॉर जॉब प्रकरणी पाटकरांचा सावंत सरकारला अल्टिमेटम

Cyber Crime: एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली सुरू असलेल्या ७८ वेबसाईट्स ब्लॉक; गोवा पोलिसांचा दणका, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT