Porvorim Traffic Jam Dainik Gomantak
गोवा

Porvorim Traffic: उड्डाणपुलाचे काम, अरुंद रस्ते आणि पाऊस; पर्वरीत वाहतूक कोंडी

Traffic News Goa: वाहतूक कोंडीमुळे गिरी व सांगोल्डा जंक्शनवरून पणजीत पोहचण्यास तासनतास तिष्ठत राहण्याची नामुष्की चालकांवर ओढवली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: पर्वरी परिसरात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी उपलब्ध असलेले रस्ते अरुंद आहेत. त्यातच रस्त्यावर नुकत्याच पडलेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत.

परिणामी पर्वरीत दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यांवर वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले असले तरी ते कमी पडत आहेत. वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत.

गिरी व सांगोल्डा जंक्शनवरून पणजीत पोहचण्यास तासनतास तिष्ठत राहण्याची नामुष्की चालकांवर ओढवली आहे. आज आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने पणजीत येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक होती.

काही दिवसांपूर्वी गिरी जंक्शनवर उड्डाणपुलाचा सेगमेंट कोसळला होता. त्यामुळे या बांधकामाच्या बाजूने सुरक्षिततेच्या दृष्टीने जागा अडवण्यात आल्याने रस्ता अरुंद झाला आहे. प्रत्येक वाहन चालकाला कामावर जाण्याची घाई असल्याने एका रांगेने न जाता रस्त्यावर तीन रांगा लावत असल्याने ही वाहतूक कोंडी होत आहे. काही ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या वाहतूक पोलिसांची तारांबळ उडत आहे.

पावसाने घेतली काहीशी उसंत

राज्यात रविवारी (२५ मे) मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सोमवारी जोरदार पाऊस पडण्याची अपेक्षा होती; परंतु सकाळपासून पावसाने काहीशी उसंत घेतली असून बऱ्याच भागांत मोकळे आकाश होते.

राज्यात ताशी ४० ते ६० किमी वेगाने वारे वाहत राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने वेधशाळेने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, पणजी मल्टिलेवल पार्किंग शेजारील रस्त्यावर सोमवारी पहाटे भले मोठे झाड कोसळले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मराठाच नव्हे, मुघलांनीही वापरलेला मार्ग होणार बंद; गोवा-कर्नाटकला जोडणारा केळघाट इतिहासजमा!

Viral Video: सायकलस्वाराचा जीवघेणा स्टंट! सोशल मीडियावर खरतनाक व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'याला लवकर मरायचंय का?'

IND vs PAK: भारत 'पाकिस्तान'सोबत क्रिकेट सामना का खेळतंय? BCCI नं स्पष्ट केली भूमिका

India vs Pakistan: भारत–पाक सामन्यावरून देशात गोंधळाचं वातावरण, कुठं आंदोलन तर कुठं टीम इंडियाच्या विजयासाठी पूजा-अर्चना Watch Video

तुमचे फोटो बनवा भन्नाट! विंटेज AI, Nano Banana ट्रेंड फॉलो करायचाय? येथे आहेत सर्व Prompt

SCROLL FOR NEXT