Fly91 Dainik Gomantak
गोवा

Fly91 : फ्लाय-91 ठरली पहिली गोमंतकीय विमान कंपनी

मनोज चाको यांची गगनभरारी; गोव्यातूनच चालवणार आस्थापन

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa International Airport: नुकत्याच सुरू झालेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळासह, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून होत असलेल्या विकासाचा परिणाम गोमंतकीय उद्योग आणि व्यवसायांवर जाणवू लागला आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणजे सप्टेंबरपासून सुरू होत असलेली गोमंतकीय उद्योजकाची पहिली विमानसेवा, ‘फ्लाय-91’. (Fly91)

पर्यटन आणि विमानसेवेत प्रदीर्घ अनुभव असलेले गोमंतकीय मनोज चाको यांनी हे धाडसी पाऊल उचलले आहे. गोव्यातूनच कार्यरत होणाऱ्या विमान कंपनीमध्ये मनोज यांचा प्रदीर्घ अनुभव आणि त्यांचे भागीदार हर्ष राघवन यांची आर्थिक गुंतवणूक आहे.

राघवन हे ‘फ्लाय 91’चे अध्यक्ष असतील, तर मनोज सीईओ. 200 कोटींची प्रारंभिक गुंतवणूक आणि दोन 70 आसनी एटीआर 72-600 टर्बोप्रोप जेट विमान यांसह प्रारंभी गोव्यासह भारतातील राज्यांत उड्डाणे भरणार आहेत.

गोव्यातूनच पहिली गोमंतकीय विमानसेवा कंपनी सुरू करण्याविषयी ‘दैनिक गोमन्तक’शी संवाद साधताना मनोज म्हणाले की, ‘गोव्यासारखा प्रदेश जगात इतर कुठेही नाही. मी येथेच लहानाचा मोठा झालो. येथेच माझे सारे शिक्षण झाले. त्यामुळे स्वत:ची कंपनी सुरू करण्यासाठी गोव्याशिवाय अन्य कुठलेही स्थान माझ्या डोक्यात आले नाही.

विमान वाहतुकीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास गोवा हे भारतातील आठव्या क्रमांकाचे बिझनेस डेस्टिनेशन आहे, तेही एकच विमानतळ होते तेव्हा. आता तर दुसराही विमानतळ कार्यान्वित झाला आहे. गोव्यातील विमान प्रवासात प्रचंड वाढ होणार आहे, असेही ते पुढे म्हणाले.

गोव्याच्या विमानसेवेची व्यग्रता केवळ काही हंगामांपुरती मर्यादित राहणार नाही. बारमाही येथे लोक येत राहाणार आहेत. गोव्यात ज्या पद्धतीने पायाभूत साधनसुविधांचा विकास, रस्ते, पूल, जलमार्ग, वायूमार्ग यांचा विकास झाला आहे, तो पाहता गोवा आता प्रमुख दहांच्या यादीत आठव्या स्थानावर समाधान मानून गप्प बसणार नाही, एवढे निश्चित. शिवाय हवामानातही इतर ठिकाणांपेक्षा खूपच अनुकूल असते. रात्रीच्या विमान प्रवासातही खूप वाढ होणार आहे.

नावात बरेच काही...

‘फ्लाय-91’ हे नाव निवडताना 91 हा क्रमांक निवडण्यामागेही एक खास कारण आहे. हा क्रमांक भारताचा डायल कोड आहे.

भाजीपुरीची चव अजूनही जीभेवर

मनोज चाको यांचे आई-वडील 1965 साली गोव्यात आले. आई-वडील दोघेही शिक्षक. वडील निर्मला इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनमध्ये शिकवायचे, तर आई रायबंदरला. मनोज यांचा जन्म रायबंदरलाच झाला. त्यांच्या मुलीचाही जन्म गोव्यातच झालाय. मनोज यांचे सगळे शिक्षणही येथेच झाले. कामानिमित्त गोवा सोडावा लागला, तरी गोव्याशी नाते काही दुरावलेले नाही. आजही ‘कॅफे भोसले’मधील भाजीपुरीची चव जीभेवर रेंगाळते, असे त्यांनी ‘गोमन्तक’शी संवाद साधताना सांगितले.

‘फ्लाय-91’ची वैशिष्ट्ये

गोव्यातूनच होणार व्यावसायिक कार्यान्वयन

प्रारंभी कमी अंतर असलेली मोजकी स्थाने

गोवेकरांच्या प्रवासी वेळांचा अभ्यास करून वेळापत्रकाची आखणी

इतर राज्यांत व्यवसाय वृद्धी झाली, तरीही मुख्यालय गोव्यातच

गोमंतकीय आदरातिथ्यासह उच्च दर्जाची सेवा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT