Goa's FLY91 airline
Goa's FLY91 airline Dainik Gomantak
गोवा

1,991 रुपयांत गोवा, हैदराबाद, बेंगळुरू आणि सिंधुदुर्ग करा विमान प्रवास; गोव्याच्या Fly91 चा शुभारंभ

Pramod Yadav

Goa's FLY91 Airline

मूळची गोव्याच्या असणाऱ्या Fly91 या विमान कंपनीने सोमवारी चार शहरांतून उड्डाणासह व्यावसायिक ऑपरेशन्सला सुरूवात केली.

कंपनीने गोवा, हैदराबाद, बेंगळुरू आणि सिंधुदुर्ग दरम्यान उड्डाणे सुरू केली आहेत. Fly91 एप्रिलमध्ये आगती, जळगाव आणि पुणे येथे उड्डाणे सुरू करणार आहे. यावेळी कंपनीने 1,991 रुपये विमान भाडे या विशेष ऑफर देखील लॉन्च केली.

Fly91 एअरलाइनच्या विमानाने गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी 7.55 वाजता बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उड्डाण घेतले.

एअरलाइनने बेंगळुरू ते सिंधुदुर्ग हे पहिले उड्डाणही चालवले. गोवा आणि बेंगळुरू दरम्यान सोमवार, शुक्रवार आणि शनिवारी उड्डाणे कार्यरत करण्याची कंपनीची योजना आहे, असे कंपनीच्या प्रवक्त्याने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कंपनीचे व्यावसायिक उड्डाण सुरू करणे एअरलाइनच्या देशांतर्गत कनेक्टिव्हिटीच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. कंपनीने लॉन्च केलेली 1,991 रुपये विमान भाड्याची विशेष ऑफर सर्व ठिकाणांसाठी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

विमान कंपनी सोमवार, शुक्रवार आणि शनिवारी गोवा आणि बेंगळुरू दरम्यान उड्डाणे चालवेल. त्याचप्रमाणे, बेंगळुरू आणि सिंधुदुर्ग दरम्यान दर आठवड्याला समान संख्येने उड्डाणे चालविली जातील. याशिवाय गोवा ते हैदराबाद आणि सिंधुदुर्ग ते हैदराबाद दरम्यान आठवड्यातून दोनदा विमानसेवा चालणार आहे, असे चाको म्हणाले.

लक्षद्वीप आणि गोवा सारख्या लोकप्रिय स्थळांशी प्रवाशांना जोडणे हा Fly91 चा उद्देश आहे. भारतातील टियर II आणि III शहरांशी हवाई संपर्क वाढवण्याचा कंपनी प्रयत्न करत आहे, असे चाको म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Muder Case: दारूची अर्धी बाटली ठरली तरुणाच्या खूनाचे कारण; मद्यधुंद मित्रानेच काढला काटा

Drummer William D'souza: प्रसिद्ध गोमंतकीय ड्रमर विलियम यांचे निधन; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Budget 2024: पीएम किसानच्या हप्त्यात होणार वाढ? कृषी तज्ञांनी अर्थमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Assagao Demolition: रमजानच्या दिवशी दोनापावल येथे शिजला घर पाडण्याचा कट, पूजा शर्माची अटक टाळण्यासाठी धडपड

Colva Police: सतावणूक केली, शंभर डॉलरही घेतले; कोलवाच्या 'त्या' PSI विरोधात आणखी एका महिलेची तक्रार

SCROLL FOR NEXT