Goa Loksabha: 50 हजारांपेक्षा जास्त कॅशसाठी वैध कागदपत्र दाखवावे लागणार, 48 भरारी पथकांची पाळत

Goa Loksabha Model code of Conduct: अवैध बाबींवर पाळत ठेवण्यासाठी उत्तरेत 23 तर दक्षिण गोव्यात 25 भरारी पथक कार्यरत असतील.
Goa Loksabha Model code of Conduct | South And North Goa DM  Press Briefing
Goa Loksabha Model code of Conduct | South And North Goa DM Press BriefingDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Loksabha Model code of Conduct

गोव्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी तयारीची माहिती पत्रकार परिषदेत दिली. अवैध बाबींवर पाळत ठेवण्यासाठी उत्तरेत 23 तर दक्षिण गोव्यात 25 भरारी पथक कार्यरत असतील.

पन्नास हजारांपेक्षा जास्त रोकड जवळ बाळगल्यास संबधित व्यक्तीला वैध कागदपत्रे दाखवावी लागतील, अशी माहिती दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू यांनी दिली.

कागदपत्रांशिवाय 50 हजारांपेक्षा जास्त रोकड जवळ बाळगल्यास जप्त केली जाणार असल्याचे चंद्रू यांनी स्पष्ट केले. संशयास्पद आर्थिक व्यवहारांबाबत माहिती देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. तर, अवैध घडमोडींवर पाळत ठेवण्यासाठी दक्षिणेत 25 भरारी पथक कार्यरत असतील, असे जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन चंद्रू म्हणाले.

तसेच, दक्षिणेत बेळगाव आणि उत्तरेत सिंधुदुर्ग सीमेवर सहा तपासणी नाक्यांवर 24 तास पोलिस तैनात असतील. पोलिसांकडून नाकाबंदीच्या काळात संशयास्पद वाहनांची तपासणी केली जाईल, असे उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी सांगितले.

Goa Loksabha Model code of Conduct | South And North Goa DM  Press Briefing
Goa Congress Loksabha Candidate: काँग्रेस उमेदवारांसाठी 'और थोडा इंतजार', दिल्लीतील बैठक रद्द

उत्तर गोव्यात 863 मतदान केंद्र कार्यरत असतील, त्यापैकी 20 पिंक (महिलांना प्राधान्य) आणि 5 केंद्र दिव्यांग मतदारांसाठी असतील. उत्तरेत 23 पेट्रोलिंग टीम कार्यरत असतील असे गिते यांनी सांगितले.

उत्तर गोव्यात 5 लाख 77 हजार 977 मतदार आहेत. महिला आणि पुरुष मतदारांसह उत्तरेत तीन ट्रान्सजेंडर मतदार असल्याची माहिती त्यांनी दिले. जिल्ह्यातील 4,955 दिव्यांग मतदार असून, पाच मतदान केंद्रावर दिव्यांग लोकांसाठी मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती गिते यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com