Premanand Chyari Dainik Gomantak
गोवा

Ponda : आरोग्य तंदुरूस्त ठेवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे 'बासरी' वादन ; बांदोड्याच्या कलावंताची रसिकांना भुरळ

प्रेमानंद च्यारी यांनी केली चित्रकलेसह वाद्य निर्मिती अन्‌ बागकलेचीही जोपासना

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda : फोंडा तालुक्यात विविध क्षेत्रांतील कलाकार आहेत. त्यापैकी बांदोडा येथील प्रेमानंद च्यारी( वय 57 )हा बासरीवादक आहे.पेशाने शिक्षक असून बासरी वादन हा त्याचा बालपणापासूनचा छंद आहे.

आधुनिक युगात पारंपरिक वाद्ये लुप्त असताना प्रेमानंदसारखा कलाकार बासरी सारख्या वाद्याद्वारे रसिकांना मंत्रमुग्ध करीत आहे. तसेच बासरी स्वतः तयार करून एक वेगळ्या प्रकारचा छंदही त्यांनी जपला आहे.

मूळ नागेश बांदोडा येथील व सध्या पाठणतळी बांदोडा येथे राहणाऱ्या प्रेमानंद च्यारी यांना बासरी वाजविण्याचा छंद लहानपणीच जडला होता. परंतु गोव्यात बासरी वादनाचे मार्गदर्शक नसल्याने प्रेमानंद यांनी स्वतः बासरी वादनाचा छंद दररोज रियाज करून पुढे नेला. उत्कृष्ट बासरी वादन करीत असल्याचे समजल्यावर एकदा धारवाड येथील छोटे रेहमान खान यांची ओळख झाली.

त्यावेळी छोटे रेहमान खान यांनी प्रेमानंद च्यारी यांना आठवड्यातून पणजी येथे मार्गदर्शन करण्यात सुरुवात केली. परंतु च्यारी यांच्या लग्नानंतर बासरी वादनाचे मार्गदर्शन घेण्यात काहीवेळा अडथळे येऊ लागले. मात्र, प्रेमानंद यांनी बासरी वादनाचा रियाज सोडला नाही. त्यानंतर पुणे येथील अरविंद गजेंद्र गडकर या सतार वादकाने प्रेमानंद यांना बासरी वादनाचे योग्य मार्गदर्शन केले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1991 साली सर्व प्रथम शिगाव कुळे येथील सरकारी हायस्कूल मध्ये चित्रकला शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. सुमारे २ वर्षे शिगाव कुळे येथे नोकरी केल्यानंतर त्याची बदली गुळेली येथील हायस्कूल मध्ये झाली.

परंतु चित्रकलेबरोबर बासरी वादनाचा छंद सोडला नाही. गोव्यात तसेच शिर्डी, पुणे, मथुरा, कणकवली, बेळगाव व अन्य ठिकाणी प्रेमानंद च्यारी यांनी बासरी वादन करून प्रेमानंद यांनी स्वतःचा ठसा उमटला आहे. त्यांनी बनवलेल्या बासरीत मंद, मध्य व ताल सप्तकांच्या बासरीचा समावेश आहे.

आरोग्य तंदुरूस्त ठेवण्यासाठी बासरी वादन उपयुक्त आहे.बासरी वादनामुळे एक प्रकारे प्राणायाम होतो. आपल्याला हवी तशी मी बासरी तयार करतो. कर्नाटकातील बासरी करणाऱ्या दोघांकडून बांबू मागवून घेतले.नंतर आसाम येथून बांबू खरेदी केली. परंतु बासरी वादन आणि निर्मितीकडे व्यवसाय म्हणून कधीच पाहिले नाही. फक्त एक छंद म्हणूनच ही कला जोपासली आहे.

प्रेमानंद च्यारी, बांदोडा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: बाहेरच्या लोकांमुळे 'सुशेगाद' गोव्याची शांतता भंग! गोमंतकीयांना RG-गोवा फॉरवर्डच्या युतीत दिसतोय 'आशेचा किरण'

Senior T20 Cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: गांजा बाळगल्याप्रकरणी मडगाव पोलिसांकडून दोघांना अटक

SCROLL FOR NEXT