Panjim News: 'त्या' चालवताहेत पित्‍याचा वारसा; पदवीधर युवतींचा तरुणांसमोर नवा आदर्श

मूर्तिकलेत युवतींचाही दबदबा : पदवीधर श्रद्धा गवंडी, अक्षया आगरवाडेकर यांनी घालून दिला आदर्श
Sculpture
SculptureDainik Gomantak
Published on
Updated on

नितीन कोरगावकर

Sculpture विविध कलांची साधना, छंद, आणि रसिकता ही कलाकार व रसिकांना समृद्ध करते. अभिजात कलांमुळे अनेक पिढ्यांचे भावविश्व समृद्ध झाले आहे. संगीत, नृत्य, नाट्य, चित्रकला, लोककला यांचा वारसा महिला कलाकारांनी पुरुष कलाकारांच्या बरोबरीने समर्थपणे चालवला आहे.

या पार्श्वभूमीवर मूर्तिकलेचा वारसाही समर्थपणे पुढे चालविणाऱ्या महिला, युवती गोव्यात आहेत याचा अभिमान वाटतो आणि त्यांचे हे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. त्‍यापैकीच दोन युवती आहेत, श्रद्धा गवंडी व अक्षया आगरवाडेकर.

Sculpture
International Yoga Day in Vasco: एमपीए प्रशासकीय कार्यालय इमारतीच्या परिसरात ‘योग सागरमाला’ या संकल्‍पनेसह योग दिवस साजरा

आता सर्वांना गणेश चतुर्थीचे वेध लागतील. गावागावांत गणपतीच्या शाळांमध्ये गणपतीच्या मूर्ती बनविण्याच्या कामास एव्हाना प्रारंभही झाला आहे.

अशावेळी दोन पदव्युत्तर पदवी घेतलेली श्रद्धा गवंडी व अक्षया आगरवाडेकर या युवती चिकणमातीत हात घालून गणपतीच्या मूर्ती बनविण्यात रस घेतात व आपल्या वाडवडिलांचा मूर्तिकलेचा वारसा पुढे चालवण्यात मनापासून दंग होतात ही गोष्टच मुळी कौतुकास्पद आहे.खरोखरच अशा युवतींचे कौतुक करावे तेवढे थोडेच.

Sculpture
Assembly Elections: फोंड्यात राजकीय हालचाली सुरू; भाजप, काँग्रेसच्‍या उमेदवारीवर नजर

अक्षया आगरवाडेकर

दुसरी युवती आहे मधलेभाट-शिवोली येथील अक्षया आगरवाडेकर. तिने फाईन आर्टमधील पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

तरीही वडील शिवोलीतील प्रसिद्ध मूर्तिकार पांडुरंग आगरवाडेकर यांचा वडिलोपार्जित मूर्तिकलेचा व्यवसाय ती निष्ठेने चालवतेय. ती उत्तम पोर्ट्रेट पण साकारते. समूहप्रदर्शनात तिने आपली चित्रे प्रदर्शित केलेली आहेत.

श्रद्धा गवंडी

पेडणे तालुक्यातील पार्से गावची सुकन्या श्रद्धा गवंडी मडगावच्या चौगुले महाविद्यालयात मराठीची प्राध्यापिका आहे. ती उत्कृष्ट अभिनेत्री म्हणूनही रंगभूमीवर चमकली आहे.

ती छान कविता करते. निवेदक म्हणूनही ती सुपरिचित आहे. आपले वडील ज्येष्ठ मूर्तिकार भानुदास गवंडी यांच्याबरोबर गणपतीच्या मूर्ती बनवून ती हा वारसा पुढे चालवत आहे हे विशेष.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com