Floating Jetty and Solar Ferry in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात लवकरच फ्लोटिंग जेटी आणि सौरऊर्जा फेरी होणार सुरू

ऑक्टाव्हियो रॉड्रिग्स : सौरऊर्जा फेरीही सुरू होणार; पर्यटनदृष्ट्या मिळणार फायदा

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात लवकरच तरंगणारा धक्का (फ्लोटिंग जेटी) आणि सौरऊर्जा फेरी सुरू होणार आहे. मॉन्सूननंतर हे दोन्ही प्रकल्प सुरू होणार असून, जलमार्ग प्रवास सहज बनवण्यावर केंद्र आणि राज्य सरकार भर देत आहे, अशी माहिती बंदर कप्तान खात्याचे सागरी अभियंता आणि जहाज सर्वेक्षक ऑक्टाव्हियो रॉड्रिग्स यांनी ‘गोमन्तक’च्या प्रतिनिधीला दिली. (Floating jetty and solar ferry goa)

तरंगणारा धक्का भारती आंतरिक जलमार्ग प्राधिकरण (आयडब्लूएआय) आणि केंद्र सरकारमार्फत; तर सौरऊर्जा फेरी गोवा सरकारच्या नदी परिवहन खात्याद्वारे केला जाणारा प्रकल्प आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे राज्याला पर्यटनदृष्ट्या फायदा होणार असल्याचे रॉड्रिग्स यांनी सांगितले.

असा असणार तरंगता धक्का

  • तरंगता धक्का पणजीतील फेरी पॉइंट येथे येणार असून, धक्क्याचे काम जवळपास पूर्ण.

  • काँक्रिटचा धक्का असल्यामुळे किमान 30 वर्षांतून एकदा त्याची दुरुस्ती करावी लागणार.

  • धक्क्याच्या बांधकामासाठी सुमारे 2.4 कोटी रुपयांचा खर्च. 100 टक्के खर्च आयडल्बूएआय करणार.

  • मॉन्सूनमध्ये धक्क्याची चाचणी होणार. धक्क्याचा वापर लहान बोट्‍स आणि प्रवासी वाहतूक करण्यासाठी केला जाणार.

  • धक्क्यावर आधुनिक सुविधा असणार असून, त्यात बोट्‍ससाठी इलेक्ट्रिक वीजपुरवठा, पाणीपुरवठा आदी सुविधांचा समावेश.

सौरऊर्जा फेरीची वैशिष्ट्ये

  • फेरी सुमारे 15 सौरऊर्जांचा वापर करणार असून, त्यात 85 टक्के बॅटरीचा वापर होणार.

  • फेरीची क्षमता सुमारे 60 प्रवासी असतील. फेरी पणजी ते चोडण जलमार्गावरही चालणार असल्याने प्रवास सोपा होईल. तरंगत्या धक्क्यावर लगेच थांबून बोट्‍सना जाता येतील.

  • सुमारे 4.2 कोटी रुपये खर्च फेरीच्या बांधकामासाठी आला आहे. आकर्षण म्हणून पर्यटकांना याचा आनंद घेता येईल,

  • गोवा सरकारच्या हरित क्रांती धोरणानुसार नदी परिवहन खात्याने सौरऊर्जा फेरी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

  • ती 8 नॉटस् वेगाने चालवणार असून, एक चार्जला साडे चार तास फेरी चालणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT