Aeroplane  Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: ..चार विमानांचे दाबोळीवरून ‘टेक ऑफ’, आणखी विमानांचा लवकर समावेश

Mauvin Godinho: दोन्ही विमानतळ सुरू राहणार आहेत कारण केंद्रीय मंत्र्यांनीही आम्हांला शब्द दिला आहे हे मंत्री मावीन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले

गोमन्तक डिजिटल टीम

Dabolim Airport Goa

पणजी: मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर दाबोळी विमानतळावरील काही उड्डाणे तेथून सुरू करण्यात आली. नागरी विमान वाहतूक केंद्रीय मंत्री किंजरपु नायडू यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी या समस्येची दखल घेऊन मोपा येथील इंडिगोची चार उड्डाणे पुन्हा दाबोळी विमानतळावरून सुरू केली. आणखी काही विमानांचे उड्डाण दाबोळीवरून होणार आहे. दोन्ही विमानतळ सुरू राहणार आहेत, याची खात्री आम्ही लोकांना दिली आहे. कारण केंद्रीय मंत्र्यांनीही आम्हांला तसा शब्द दिला आहे, मंत्री मावीन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.

गुदिन्हो म्हणाले, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत मी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी आम्ही आमच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या होत्या. दाबोळी विमानतळ आमच्यासाठी बंद करू नये, असेही त्यांना सांगितले होते.

आम्हाला दोन्ही विमानतळाची आवश्यकता आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mopa International Airport) दाबोळी विमानतळावरील उड्डाणे न नेता त्यांनी अजून काही शहरे जोडण्यावर भर द्यावा. मोपात गोवा राज्यही भागीदारी आहे त्यामुळे दोन्ही विमानतळ हे राज्याच्या हितासाठीच आहे. दक्षिण जिल्ह्यातील आणि पणजीतील लोकांना दाबोळी विमानतळ अधिक सोयीस्कर आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे, असे गुदिन्हो म्हणाले.

पर्वरी येथे महामार्गाचे काम सुरु झाल्याने प्रवासी मोपावर जाण्यापेक्षा दाबोळी विमानतळावर उतरणे अधिक पसंत करतात. त्यातही झुआरी पूल झाल्याने दाबोळी ते पणजी प्रवास अधिक सोयीस्कर बनला आहे. मोपा विमानतळावर लोक एकदाच जातात आणि नंतर मात्र ते दाबोळी पसंत करतात, अशा प्रतिक्रिया लोकांनीच दिल्याचे मंत्री मावीन गुदिन्हो यांनी सांगितले.

जीएमआरकडून दबाव

दाबोळीतील विमाने मोपा विमानतळाकडे वळवण्यासाठी जीएमआर दबाव टाकत आहे. मोपा विमानतळामध्ये गोवा सरकारचाही सहभाग आहे, हे जीएमआरने विसरू नये. राज्य सरकारने मोपा विमानतळावर गुंतवणूक केली आहे. दोन्ही विमानतळ व्यवस्थित सुरू राहावे, अशी सरकारची इच्छा असल्याचे मंत्री गुदिन्हो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT