BITS Pilani Campus Goa Dainik Gomantak
गोवा

BITS Pilani: नऊ महिन्यांत पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू; बिट्स पिलानी कॅम्पसमधील मृत्यूबाबत न्यायालयीन चौकशीची मागणी

BITS Pilani Campus Goa: पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली, तेथे त्यांना ऋषी बेशुद्ध अवस्थेत असल्याचे आढळले, त्याची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: सांकवाळ झुआरीनगर येथील बिट्स पिलानी गोवा कॅम्पसमध्ये गेल्या १६ ऑगस्टला मृतावस्थेत सापडलेल्या कुशाग्र जैन (२०) यांच्या मृत्यूसंबंधीच्या चर्चेला विराम बसण्यापूर्वी गुरुवारी (ता.४) आणखी एक वीस वर्षीय विद्यार्थी मृतावस्थेत सापडला. मृतावस्थेत सापडलेल्या विद्यार्थ्यांचे नाव ऋषी नायर (२०, रा. बंगळुरु) असे आहे. गेल्या नऊ महिन्यात बिट्स पिलानी गोवा कॅम्पसमध्ये पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने विद्यार्थी, पालक व सर्वसामान्य नागरिक धास्तावले आहेत.

या मृत्यूमुळे बिट्स पिलानी विषयी तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. डिसेंबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ पर्यंत बिट्स पिलानी गोवा कॅम्पसमध्ये ४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या तर एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. गृह विभागाच्या पोलिस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी मृत विद्यार्थ्यांच्या मृत्यू विषयी अधिक माहिती जाणून घेतली.

यावेळी मुरगाव तालुक्याचे पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम, वेर्णा पोलिस निरीक्षक आनंद शिरोडकर, इतर पोलिस अधिकारी व बिट्स पिलानी शिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. साकवाळ येथील उच्च शैक्षणिक संस्था बिट्स पिलानी कॅम्पस मध्ये गुरुवार (दि.४) रोजी कॅम्पसच्या विद्यार्थी वसतिगृहात ऋषी राकेश नायर याचा मृतदेह आढळला. ऋषीचा मृतदेह ज्या ठिकाणी होता, तेथे त्यांनी उलट्या केल्याचे पोलिसांना आढळल्या.

ऋषीने सकाळपासून आपल्या खोलीचा दरवाजा उघडला नसल्याने अखेर दरवाजा तोडण्यात आला. यावेळी ऋषी खोलीत बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसून आले. बिट्स पिलानीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित वेर्णा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली, तेथे त्यांना ऋषी बेशुद्ध अवस्थेत असल्याचे आढळले, त्याची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.

पोलिसांनी ऋषीच्या मृत्यूचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ (हॉस्पिसियोत) पाठविला आहे. मृत्यू कशा प्रकारे झाला यांची माहिती शवचिकित्सेनंतर कळणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

'आप'ची न्यायालयीन चौकशीची मागणी

आम आदमी पार्टी (वास्को युनिट) बिट्स पिलानी गोवा कॅम्पसमध्ये अलिकडच्या काळात झालेल्या अनैसर्गिक मृत्यूंच्या मालिकेमुळे खूप अस्वस्थ आहे, ज्यामध्ये गेल्या नऊ महिन्यांत पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

या दुःखद घटनांमुळे विद्यार्थी कल्याण, कॅम्पस सपोर्ट सिस्टम आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्याच्या संस्थेच्या क्षमतेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाल्या आहेत. या त्रासदायक घटाच्या पार्श्वभूमीवर, या मृत्यूंविषयी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन चौकशीची मागणी आपचे सुनील लॉरेन यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mungul Gang War: मुंगूल गँगवॉरप्रकरणी 10 आरोपींना जामीन मिळणार की नाही? 12 डिसेंबरला कोर्टाचा फैसला; साक्षीदारांना धमकावण्याची भीती

Goa Nightclub Fire: क्लब जळून खाक, मालक विदेशात फरार! पळपुड्या मालकांसाठी गोवा पोलिसांकडून 'लुक आऊट' नोटीस जारी; इंटरपोलची घेणार मदत

गोमंतकीय भाविकांसाठी खुशखबर! गोव्याहून शिर्डी-तिरुपतीसाठी सुरु होणार विमानसेवा; खासदार तानावडेंनी केली खास मागणी

Delhi Blast: प्रेमात धोका, एक्स-बॉयफ्रेंडकडून बदला! दिल्ली ब्लास्ट आणि 'डॉक्टरांच्या' कटाच्या पर्दाफाशाचा ओमर अब्दुल्लांनी केला खुलासा

Wild Boar Attack: बेंदुर्डे येथे रानडुकराच्या हल्ल्यात 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, काजू बागायतीत गेला होता सफाईसाठी

SCROLL FOR NEXT