
Mumbai Goa Highway Traffic Jam
मुंबईकर गणेश भक्तांच्या घरपरतीच्या प्रवासामुळे रायगड जिल्ह्यातील लोणेरे, माणगाव आणि इंदापुर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असले तरी इंदापुर, माणगाव आणि लोणेरे परिसरात बॉटलनेकसारखी परिस्थिती असल्याने प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. गणेश उत्सवाच्या समाप्तीनंतर भक्तांचा परतीचा प्रवास जोरदार सुरू झाला असून, त्यामुळे रस्त्यांवर वाहतुकीची गती खूपच मंदावली आहे.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस प्रशासन सतत प्रयत्न करत आहे, मात्र वाहनांची प्रचंड गर्दी आणि चालू असलेले रस्ते यामुळे पोलिसांची दमछाक होत आहे. पोलिसांनी वाहतुकीसाठी विशेष मार्गदर्शन आणि बॅरिअर्स लावून नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला असला तरी, प्रवाशांना वाहतूक कोंडीमुळे सामान्य वेळेच्या तुलनेत प्रवासात जास्त वेळ लागत आहे.
संबंधित पोलिसांनी प्रवाशांना संयम ठेवण्याची आणि रस्त्यांवर सुरक्षित अंतर राखण्याची सूचना केली आहे. वाहतूक सुरळीत करताना पोलीसांची दमछाक होताना पाहायला मिळत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी या प्रकारची वाहतूक कोंडी दिसल्यामुळे स्थानिक प्रशासनाला प्रशासनिक आव्हान निर्माण झाले आहे. प्रशासनाचे म्हणणे आहे की चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होईल, पण सध्या गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासामुळे वाहतूक कोंडी टाळणे कठीण आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.