Goa Election Candidates Dainik Gomantak
गोवा

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी पाच दाम्पत्यांसह बापलेकही रिंगणात

फॅमिलीराज मुद्दा गौण : ...तर विधानसभेत 6 कुटुंबांतील 12 सदस्य

Anil Patil

पणजी: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने उडी घेऊन आक्रमकरित्या प्रचार सुरू केल्याने चांगलीच रंगत आली असताना आणखी एका मुद्द्याची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीत पाच दाम्पत्ये आणि एक बापलेक राजकीय भवितव्य आजमावत आहेत. ही पाच दाम्पत्ये  आणि बापलेक निवडून आली तर 40 जागांच्या विधानसभेत सहा कुटुंबातील 12 सदस्य असतील. हे प्रमाण एकूण आमदारांच्या 30 टक्के म्हणजे एक चतुर्थांशपेक्षा जास्त असेल.  त्यामुळे कितीही विरोध झाला, तरी गोव्याच्या (Goa) राजकारणात ‘फॅमिलीराज’चा मुद्दा गौण ठरला आहे. (Goa Assembly Election 2022 Latest News Udpates)

संबंधितांनी आपापल्या मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सत्ताधारी भाजपच्या (BJP) तिकिटावर वाळपई मतदारसंघातून आरोग्यमंत्री विश्वजीत राणे तर पर्येतून डॉ. दिव्या राणे रिंगणात आहेत. पणजी मतदारसंघातून बाबूश मोन्सेरात तर ताळगावमधून महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर भाजपच्या तिकिटावर केपे मतदारसंघातून तर त्यांच्या पत्नी सावित्री कवळेकर सांगे येथून अपक्ष निवडणूक लढवित आहे.

काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनेही एकेका दाम्पत्याला संधी दिली आहे. कळंगुट मतदारसंघामधून मायकल लोबो तर बाजूच्या शिवोली मतदारसंघातून त्यांची पत्नी दिलायला लोबो काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. याशिवाय थिवी मतदारसंघातून कविता कांदोळकर आणि शेजारील हळदोणा मतदारसंघातून किरण कांदोळकर तृणमूल पक्षाच्या (TMC) तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. या पाच दाम्पत्यांशिवाय बाणावली मतदारसंघातून चर्चिल आलेमाव तर शेजारील नावेली मतदारसंघातून त्यांची मुलगी वालंका आपले नशीब आजमावत आहे.

--------------

विश्‍वजीत राणे (भाजप, वाळपई)

दिव्या राणे (भाजप, पर्ये)

पर्ये मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रतापसिंग राणे यांनी माघार घेतली. आता तेथे दिव्या राणे रिंगणात आहेत.

--------------

बाबूश मोन्सेरात (भाजप, पणजी)

जेनिफर मोन्सेरात (भाजप, ताळगाव)

जेनिफर या 2017 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकल्या होत्या.

--------------

मायकल लोबो (काँग्रेस, कळंगुट)

दिलायला लोबो (काँग्रेस, शिवोली)

दिलायला यांना तिकीट नाकारल्यानंतर लोबो यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

किरण कांदोळकर (तृणमूल काँग्रेस, हळदोणा)

कविता कांदोळकर (तृणमूल काँग्रेस, थिवी)

किरण यांनी गोवा फॉरवर्ड पक्षातून बाहेर पडत तृणमूल काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केला आहे.

--------------

चंद्रकांत कवळेकर (भाजप, केपे)

सावित्री कवळेकर (अपक्ष, सांगे)

दोघांनी 2017 मध्ये निवडणूक लढवली होती.

--------------

चर्चिल आलेमाव (बाणावली, तृणमूल काँग्रेस)

वालंका आलेमाव (नावेली-तृणमूल काँग्रेस)

वालंका या चर्चिल आलेमाव यांच्या कन्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

Goa Today's Live News: महिलेच्या गळ्यातील लाखभर रुपयांचे मंगळसूत्र लंपास

Honda IDC: अनेकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी बनलेली सत्तरीतील 'ती औद्योगिक वसाहत पडलीये ओसाड

Chitrasangam 2024: प्रतिभावंतांचा कलाबहर! 'चित्रसंगम'मध्ये 17 चित्रकारांच्या कलाकृती

12th Fail अभिनेत्याकडे नव्हते गोव्यात हॉटेलचे बिल द्यायला पैसे, मुंबईच्या तिकिटासाठी विकला मोबईल; विक्रांतने सांगितला किस्सा

SCROLL FOR NEXT