Goa Election 2022
Goa Election 2022 Dainik Gomantak
गोवा

Goa Election 2022 : मगोच्या पाठिंब्याला पाच भाजप आमदारांचा विरोध

दैनिक गोमन्तक

Goa Election 2022 : गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. भाजपला सर्वाधिक 20 जागा मिळाल्या असून काँग्रेसला (Congress) 12 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे आम्हीच राज्यात सत्ता स्थापन करू असे म्हणणाऱ्या काँग्रेसचे सत्तेचे स्वप्न भंग झाले. तर अपक्ष आमदारांनीही आपला पाठिंबा भाजपला जाहीर केल्याने भाजपचा सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यातच मगोपनेही आपल्या पाठिंब्याचं पत्र भाजपला दिल्याचं गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केलं होतं, मात्र भाजपच्याच काही आमदारांनी मगोपच्या पाठिंब्याला विरोध केला आहे. त्यामुळे राज्यात स्थापन होणाऱ्या नवीन सरकारचा भाग मगो असेल की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (Five BJP MLAs oppose to Mago's support)

गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणूका (Assembly election) निकाल आज लागला आणि भाजपने पुन्हा राज्याची सत्ता हाती घेतली आहे. यावेळी भाजपला सर्वाधिक 20 जागा मिळाल्या असून सत्ता स्थापनेसाठी फक्त एका आमदारांचीच गरज आहे, असे असतानाच तीन अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. तर भाजपचे गोवा (Goa) निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, मगो राज्यातील स्थापन होणाऱ्या नवीन सरकारचा (government) भाग असणार आहे. एमजीपीने भाजपला पाठिंब्याचे पत्र दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यावर फोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्यासह पाच आमदारांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. भाजपने मगोचा बिनशर्त पाठिंबा घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी त्याला विरोध केला आहे.

भाजपला (BJP) २० जागा मिळाल्या आहेत व तीन अपक्षांनीही पाठिंबा दिला आहे त्यामुळे इतरांच्या पाठिंब्याची गरज कशाला हवी असा प्रश्‍न आमदार रवी नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. या विरोधाला आमदार बाबुश मोन्सेरात, आमदार गोविंद गावडे, आमदार सुभाष शिरोडकर व आमदार (MLA) माविन गुदिन्हो यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute ODP: कळंगुट ओडीपी खटला लांबणीवर; सुनावणीसाठी तयार नसल्याने सरकारवर ओढावली नामुष्की

Goa Rain Update: गोव्यात 'यलो अलर्ट': पणजीत सर्वाधिक तापमानाची नोंद

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा प्रवासासाठी आता तीन पर्याय; महाराष्ट्र सरकारकडून आणखी दोन महामार्गांचा प्रस्ताव

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर मद्यपींचा धिंगाणा; टॅक्सीचालकाला मारहाण

Goa Crime News: पेडण्यात टॅक्सीचालकांनी आणले कोनाडकरांचे खून प्रकरण उघडकीस

SCROLL FOR NEXT