Goa Election 2022 Live Update: गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये भाजप पिछाडीवर असून काँग्रेस आघाडीवर होते; पण नंतर भाजपने (BJP) मुसंडी मारत आघाडी गाठली आणि या यावर्षीच्या निवडणुकीमध्ये विजयी म्हणून घोषित झाले. भाजपला सर्वाधिक 20 जागा मिळाल्या असून काँग्रेसला (Congress) 12 जागांवर समाधान मानावे लागले. आता भाजप लवकरच सत्ता स्थापन करणार असून, सर्वांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.
यशस्वी व्हायचे असेल तर बदला अपरिहार्य शशी थरूर यांची प्रतिक्रीया
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला कमी फरकाने कमी पडल्यामुळे पक्षाचे नेते शशी थरूर यांनी लोकांना प्रेरणा देण्यासाठी "संघटनात्मक नेतृत्वात सुधारणा" करण्याच्या गरजेवर भर दिला. "आम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर बदल अटळ आहे," असे त्यांनी ट्विट केले.
अमित शहा यांची प्रतिक्रीया
गोवावासीयांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदी कोणतीही कसर सोडणार नाहीत: अमित शहा
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी 'भाजपवर विश्वास दाखवल्याबद्दल' गोव्यातील जनतेचे आभार मानले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिल्लीतील भाजप मुख्यालयात आगमन. गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये पक्ष विजयी झाला.
MGP गोव्यातील नवीन सरकारचा भाग असेलः फडणवीस
भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मगो राज्यातील स्थापन होणाऱ्या नवीन सरकारचा भाग असणार आहे. एमजीपीने भाजपला पाठिंब्याचे पत्र दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.
विधिमंडळाच्या गटनेत्याची निवड करण्यासाठी शुक्रवारी पक्षाची बैठक : देवेंद्र फडणवीस
भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, विधिमंडळाच्या गटनेत्याची निवड करण्यासाठी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक बहुतांशी शुक्रवारी होणार आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले
भाजपच्या आजच्या सणसणीत विजयानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सर्वांचेच मनापासून आभार मानले. यावेळी त्यांनी गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले. फडणवीसांनी केलेल्या सहकार्याबद्दल आणि त्यांच्या योगदानाबद्दल आभारी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. असेच सहकार्य इथून पुढे रहावे अशी इच्छाही सावंत यांनी दर्शवली.
युती न करता 20 जागा मिळाल्या : सावंत
मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, मला गोव्यातील जनतेचे आभार मानायचे आहेत. आम्ही 22 मागितले होते पण आम्ही कमी पडलो. आम्ही पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छितो. इथे येणाऱ्या सर्व नेत्यांनाही श्रेय द्यायचे आहे. आम्ही येथे 10 वर्षे होतो. सत्ताविरोधी लाट असल्याचे अनेकांनी सांगितले, मात्र विकासकामांमध्ये आमचाच विजय होईल, असा विश्वास होता. कोणतीही युती न करता आम्हाला 20 जागा मिळाल्या आहेत. मतदानाचा वाटा देखील 34.3% आहे त्यामुळे आम्ही आमचा आधार देखील वाढवला आहे.
भाजप गोवा डेस्क प्रभारी सीटी रवी यांची प्रतिक्रीया
सध्या आमच्याकडे 20+5 जागा आहेत, परंतु विधानसभेत आम्ही फ्लोर टेस्टसाठी जाऊ तेव्हा आमच्याकडे जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे: भाजप गोवा डेस्क प्रभारी सीटी रवी
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया
आम्ही 20 जागा जिंकल्या आहेत. एमजीपीने आम्हाला समर्थनाचे पत्रही दिले आहे. तीन अपक्ष आमदारांनीही आम्हाला पाठिंबा दिला आहे. तर आता भाजप कडे 20+3+2=25 जागा आहेत. आणखी उमेदवार आमच्यासोबत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करत आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 7 वाजता दिल्लीतील पक्ष मुख्यालयातून भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
भारतीय जनता पक्ष - 20 जागा
▪️ पेडणे : प्रवीण आर्लेकर
▪️ थिवी : नीळकंठ हळर्णकर
▪️ म्हापसा : ज्योसुआ डिसोझा
▪️ पर्वरी : रोहन खंवटे
▪️ पणजी : बाबूश उर्फ आतानासियो मोन्सेरात
▪️ ताळगाव : जेनिफर मोन्सेरात
▪️ मये : प्रेमेंद्र शेट
▪️ साखळी : प्रमोद सावंत
▪️ पर्ये : देविया उर्फ दिव्या राणे
▪️ वाळपई : विश्वजित राणे
▪️ प्रियोळ : गोविंद गावडे
▪️ फोंडा : रवी नाईक
▪️ शिरोडा : सुभाष शिरोडकर
▪️ वास्को-द-गामा : कृष्णा सालकर
▪️ दाबोळी : माविन गुदिन्हो
▪️ नावेली : उल्हास तुयेकर
▪️ कुडचडे : नीलेश काब्राल
▪️ सावर्डे : गणेश गावकर
▪️ सांगे : सुभाष फळदेसाई
▪️ काणकोण : रमेश तवडकर
मतमोजणीच्या दिवशी विजयी मिरवणुकीवरील बंदी EC ने उठवली
निवडणूक आयोगाने निवडणूक झालेल्या पाच राज्यांतील मतमोजणी आणि निकाल जाहीर करताना विजयी मिरवणुकांवर पूर्वी घातलेली बंदी उठवली.
गुरुवारी एका निवेदनात, मतदान पॅनेलने म्हटले आहे की या राज्यांमधील COVID-19 ची सद्यस्थिती लक्षात घेऊन, "मतमोजणीच्या दरम्यान आणि नंतर विजयी मिरवणुकीवरील मार्गदर्शक तत्त्वे शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे आणि विजय मिरवणुकीवरील ब्लँकेट बंदी मागे घेतली आहे. "
8 जानेवारी रोजी EC ने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरमधील विधानसभा निवडणुकांसाठी बॉल रोलिंग सेट केले, 10 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान सात टप्प्यांत वेळापत्रक जाहीर केले आणि 10 मार्च रोजी मतमोजणी केली.
गोव्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणुकीत पराभूत
गोव्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गुरुवारी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या जवळच्या काँग्रेस प्रतिस्पर्ध्यांकडून पराभव पत्करला आहे.
गोव्यातील सर्व लोकांचे आणि कार्यकर्त्यांचे अथक प्रयत्नांसाठी आभार : जी. किशन रेड्डी
2022च्या विधानसभा निवडणुकीचा सह-प्रभारी म्हणून, मला अनेक अनुभवी लोकांसोबत संवाद साधण्याची आणि काम करण्याची संधी मिळाली आहे. मी पुन्हा एकदा गोव्यातील सर्व लोकांचे आणि कार्यकर्त्यांचे त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी आणि अथक प्रयत्नांसाठी आभार मानतो, असे मत केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी यांनी व्यक्त केले
उत्तर गोवा
01) मांद्रे - जीत आरोलकर - मगोपा
02) पेडणे - प्रवीण आर्लेकर - भाजपा
03) डिचोली - डॉ. चंद्रकांत शेट्ये - अपक्ष
04) थिवी - निळकंठ हळर्णकर - भाजपा
05) म्हापसा - ज्योसुआ डिसोझा - भाजपा
06) शिवोली - डिलायल लोबो - काँग्रेस
07) साळगांव - केदार नाईक - काँग्रेस
08) कळंगुट - मायकल लोबो - काँग्रेस
09) पर्वरी - रोहन खंवटे - भाजपा
10) हळदोणे - कार्लोस फेरेरा - काँग्रेस
11) पणजी - बाबूश उर्फ आतानासियो मोन्सेरात - भाजपा
12) ताळगाव - जेनिफर मोन्सेरात - भाजपा
13) सांताक्रूझ - रुडॉल्फ फर्नांडिस - काँग्रेस
14) सांत आंद्रे - विरेश बोरकर - आरजी
15) कुंभारजुवा - राजेश फळदेसाई - काँग्रेस
16) मये - प्रेमेंद्र शेट - भाजपा
17) सांखळी - डॉ. प्रमोद सावंत - भाजपा
18) पर्ये - देविया उर्फ दिव्या राणे - भाजपा
19) वाळपई - विश्वजित राणे - भाजपा
दक्षिण गोवा
20) प्रियोळ - गोविंद गावडे - भाजपा
21) फोंडा - रवी नाईक - भाजपा
22) शिरोडा - सुभाष शिरोडकर - भाजपा
23) मडकई - सुदिन उर्फ रामकृष्ण ढवळीकर - मगोपा
24) मुरगाव - संकल्प आमोणकर - काँग्रेस
25) वास्को-द-गामा - कृष्णा उर्फ दाजी साळकर - भाजपा
26) दाबोळी - माविन गुदिन्हो - भाजपा
27) कुठ्ठाळी - आंतोनियो वास - अपक्ष
28) नुवे - आलेक्स सिक्वेरा - काँग्रेस
29) कुडतरी - आलेक्स लॉरेन्स रेजिनॉल्ड - अपक्ष
30) फातोर्डा - विजय सरदेसाई - गोवा फॉरवर्ड
31) मडगाव - दिगंबर कामत - काँग्रेस
32) बाणावली - वेन्झी व्हीएगश - आप
33) नावेली - उल्हास तुयेकर - भाजपा
34) कुंकळ्ळी - युरी आलेमाव - काँग्रेस
35) वेळी - क्रूझ सिल्वा - आप
36) केपे - आल्टन डिकॉस्टा - काँग्रेस
37) कुडचडे - नीलेश काब्राल - भाजपा
38) सावर्डे - गणेश गावकर - भाजपा
39) सांगे - सुभाष फळदेसाई - भाजपा
40) काणकोण - रमेश तवडकर - भाजपा
उत्तर गोवा
उत्तर गोव्यातील 19 जागांपैकी 10 जागा भाजपच्या उमेदवारांनी जिंकल्या आहेत, 6 जागा काँग्रेसने आणि प्रत्येकी एक जागा मगो, रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी आणि 1 जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली असल्याचे उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी सांगितले.
2022च्या विधानसभा निवडणुकीत गोवेकरांचा कौल कुणाला?
2022च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 20 जागा जिंकल्या आहेत, काँग्रेसने 9 जागा जिंकल्या आणि 2 जागांवर आघाडी घेतली, महाराष्ट्रवादी गोमंतक आणि आप प्रत्येकी 2 जागांवर असून गोवा फॉरवर्ड पार्टी आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी प्रत्येकी 1 जागेवर आहेत. त्याचप्रमाणे 3 अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
गोवा भाजपची आज पत्रकार परिषद
गोवा भाजपची आज संध्याकाळी 6 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे आणि गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
गोव्यातील जनतेचा निकाल आम्हाला मान्य आहे: काँग्रेस नेते पी. चिदंबरम
"आम्हाला गोव्यातील जनतेचा निर्णय मान्य आहे. अनेक अडथळ्यांना न जुमानता आमचे उमेदवार धाडसाने लढले. लोकांनी भाजपला (Goa BJP) सत्तेसाठी कौल दिला आहे आणि आम्ही ते मान्य करतो. अनेक मतदारसंघात आमचा फार कमी फरकाने पराभव झाला," असे काँग्रेस नेते पी चिदंबरम म्हणाले. .
काँग्रेस दिनेश गुंडू राव यांनी आजच्या निकालांबाबत अपली भुमिका स्पष्ट केली ते म्हणाले या निकालांबाबत निराश असून, चांगल्या परिस्थितीची अपेक्षा होती. मात्र आम्ही जबाबदार विरोधी पक्ष राहु आणि आक्रमकपणे मुद्दे मांडू. राज्य विधानसभेत आणि बाहेर विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे.
पणजी, तळेगावमधून भाजपने रिंगणात उतरवलेले दाम्पत्य विजयी; कळंगुटमधून मायकेल लोबो विजयी
पणजी आणि तळेगाव मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अटानासिओ मोन्सेरात आणि त्यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात यांनी अनुक्रमे विजय मिळवला आहे. वाळपई आणि पर्ये विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विश्वजित राणे आणि त्यांच्या पत्नी देविया विश्वजित राणे विजयी झाले आहेत.
कळंगुट मतदारसंघातून काँग्रेसचे मायकल व्हिन्सेंट लोबो विजयी झाले असून त्यांच्या पत्नी डिलायला मायकल लोबो हे शिवोलिम विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्वीटद्वारे जनतेचे आभार मानले
भाजपवर विश्वास आणि प्रेम दाखविल्याबद्दल त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवल्याबद्दल मी गोव्याच्या जनतेचे मनापासून आभार मानतो.
प्रमोद सावंत मुख्यमंत्रीपदी कायम राहणार का या प्रश्नावर भाजप नेते विश्वजित राणे यांनी ठेवले मौन, ते म्हणाले "मला माहित नाही, हा एक संवेदनशील प्रश्न आहे,"
सांतआंद्रे मतदारसंघातील रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टीचे विजयी उमेदवार विरेश बोरकर म्हणाले की, 'आम्ही पैसे आणि पॉवरशिवाय विजयी झालो आहेत.'
पाचही राज्यात पक्षाचा पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, “लोकांचा निर्णय नम्रपणे स्वीकारा”
मेहनत करण्याचे आश्वासन
काँग्रेस नेते मायकल लोबो म्हणाले की, पक्ष जनतेचा जनादेश मान्य करेल आणि विरोधी पक्ष म्हणून भक्कमपणे काम करेल. “आम्हाला 12 जागा मिळाल्या आहेत, तर भाजपला 18 जागा मिळाल्या आहेत. लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी काँग्रेसला कठोर परिश्रम करावे लागतील, असे ते म्हणाले.
दरम्यान, टीएमसी, ज्यांची युती 40 पैकी 3 जागांवर आघाडीवर आहे, म्हणाले की पक्ष “प्रत्येक गोव्याचा विश्वास आणि प्रेम मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास वचनबद्ध आहे. कितीही वेळ लागला तरी आम्ही इथेच राहू आणि गोव्याच्या लोकांची सेवा करत राहू.”
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणतात..
माझ्यासाठी हे खूप आव्हानात्मक होतं. कारण मी राज्यभर प्रचार करत होतो; पण मला माझ्या स्वतःच्या मतदारसंघात जास्त पोहोचता आले नाही. तरी माझ्या कार्यकर्त्यांनी माझा प्रचार केला. मी कमी फरकाने जिंकलो असलो तरीपण आम्ही बहुमताने जिंकलो आहोत. ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आमच्या 20 जागा निश्चित झाल्या असून, 3 अपक्षांकडून पाठिंबा जाहीर झाला आहे.
गोव्यात टीएमसीने पराभव स्वीकारला
गोवा टीएमसी नेत्यांनी म्हटले आहे की, आम्ही हा आदेश नम्रतेने स्वीकारतो. प्रत्येक गोंयकरांचा विश्वास आणि प्रेम जिंकण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करू. कितीही वेळ लागला तरी आम्ही इथेच राहू आणि गोव्यातील जनतेची सेवा करत राहू.
गोवा विधानसभेत कुणाला किती जागा मिळाल्या...?
भाजप : 20
काँग्रेस : 11
आप : 2
मगो : 2
आरजीपी : 1
अपक्ष : 3
गोवा फॉरवर्ड पार्टी : 1
तृणमूल काँग्रेस : 0
राष्ट्रवादी : 0
सर्वांना सोबत घेऊन आम्ही आमचे सरकार बनवू: भाजप नेते देवेंद्र फडणवीस
गोव्यातील जनतेने आम्हाला स्पष्ट बहुमत दिले आहे. आम्हाला 20 जागा मिळतील किंवा 1-2 जागा जास्त मिळतील. जनतेने पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवला आहे. गोव्यातील अपक्ष उमेदवार आम्हाला पाठिंबा देत आहेत. मगोही आमच्यासोबत येत आहे आणि सर्वांना सोबत घेऊन आम्ही आमचे सरकार बनवू: भाजप नेते देवेंद्र फडणवीस
पक्षाला मिळत असलेल्या विजयामुळे भाजप गोवा कार्यालयात जल्लोष सुरू..!
मुरगाव मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संकल्प आमोणकर यांनी भाजप उमेदवार मिलिंद नाईक यांचा दारूण पराभव करत विजय प्राप्त केला आहे. त्यांनी 1941 इतक्या मतांनी आघाडी घेतली.
गोव्यात AAP ने 2 जागा जिंकून आणि TMC उमेदवार आलेमाव यांचा पराभव केला
पंजाबमध्ये सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असलेल्या 'आप'ने दक्षिण गोव्यात दोन जागा जिंकून गोवा विधानसभेतही प्रवेश केला. राज्यात 2017 ची विधानसभा निवडणूक लढवताना पक्षाला रिक्त स्थान मिळाले होते परंतु दुसर्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वेळी आणि बाणावलीमध्ये विजय मिळवला.
विजयी उमेदवार - पराभूत उमेदवार
1) हळदोणे
- ग्लेन टिकलो (भाजप)
- कार्लोस फरेरा (काँग्रेस)
2) बाणावली
- व्हेन्झी व्हिएगस (आप)
- टोनी डायस (काँग्रेस)
- चर्चिल आलेमाव (तृणमूल)
3) डिचोली
- चंद्रकांत सावळ (अपक्ष)
- नरेश सावळ (मगो)
- राजेश पाटणेकर (भाजप)
4) कळंगुट
- मायकल लोबो (काँग्रेस)
- जोसेफ सिक्वेरा (भाजप)
5) काणकोण
- रमेश तवडकर (भाजप)
- जनार्दन भंडारी (काँग्रेस)
- इजिदोर फर्नांडिस (अपक्ष)
6) कुठ्ठाळी
- गिरीश पिल्लई (अपक्ष)
- आंतोनियो वाझ (अपक्ष)
- गिल्बर्ट रॉड्रिग्स (तृणमूल)
7) कुंभारजुवे
- राजेश फळदेसाई (काँग्रेस)
- रोहन हरमलकर (अपक्ष)
8) कुंकळ्ळी
- युरी आलेमाव (काँग्रेस)
- क्लाफास डायस (भाजप)
- विल्सन कार्दोझ (रिव्होल्युशनरी गोवन्स)
9) कुडचडे
- नीलेश काब्राल (भाजप)
- अमित पाटकर (काँग्रेस)
10) कुडतरी
- आलेक्स रेजिनाल्डा लॉरेन्स (अपक्ष)
- रुबर्ट परेरा (रिव्होल्युशनरी गोवन्स)
- डॉमनिक गावकर (आप)
11) दाबोळी
- माविन गुदिन्हो (भाजप)
- कॅप्टन व्हिरियातो फर्नांडिस (काँग्रेस)
12) फातोर्डा
- विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड)
- दामू नाईक (भाजप)
13) मये
- प्रेमेंद्र शेट (भाजप)
- संतोष सावंत (गोवा फॉरवर्ड)
14) मांद्रे
- जीत आरोलकर (मगो)
- दयानंद सोपटे (भाजप)
- लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष)
15) म्हापसा
- जोशुआ डिसोझा (भाजप)
- सुधीर कांदोळकर (काँग्रेस)
16) मडकई
- रामकृष्ण (सुदिन) ढवळीकर (मगो)
- प्रेमानंद गावडे (रिव्होल्युशनरी गोवन्स)
- सुदेश भिंगी (भाजप)
17) मडगाव
- दिगंबर कामत (काँग्रेस)
- मनोहर (बाबू) आजगावकर (भाजप)
18) मुरगाव
- संकल्प आमोणकर (काँग्रेस)
- मिलिंद नाईक (भाजप)
19) नावेली
- आवेर्तान फुर्तादो (काँग्रेस)
- वालंका आलेमाव (तृणमूल)
- प्रतिमा कुतिन्हो (आप)
20) नुवे
- आलेक्स सिक्वेरा (काँग्रेस)
- अरविंद डिकॉस्ता (रिव्होल्युशनरी गोवन्स)
21) पणजी
- आतानासियो (बाबूश) मोन्सेरात (भाजप)
- उत्पल पर्रीकर (अपक्ष)
- एल्विस गोम्स (काँग्रेस)
22) पेडणे
- प्रवीण आर्लेकर (भाजप)
- राजन कोरगावकर (मगो)
23) फोंडा
- केतन भाटीकर (मगो)
- राजेश वेरेकर (काँग्रेस)
- रवी नाईक (भाजप)
24) पर्ये
- दिव्या राणे (भाजप)
- विश्वजीत कृ. राणे (आप)
25) पर्वरी
- रोहन खंवटे (भाजप)
- संदीप वझरकर (तृणमूल)
26) प्रियोळ
- पांडुरंग (दीपक) ढवळीकर (मगो)
- गोविंद गावडे (भाजप)
27) केपे
- एल्टन डिकॉस्ता (काँग्रेस)
- चंद्रकांत (बाबू) कवळेकर (भाजप)
28) साळगाव
- केदार नाईक (काँग्रेस)
- जयेश साळगावकर (भाजप)
29) सांगे
- सुभाष फळदेसाई (भाजप)
- सावित्री कवळेकर (अपक्ष)
- प्रसाद गावकर (काँग्रेस)
30) साखळी
- डॉ. प्रमोद सावंत (भाजप)
- धर्मेश सगलानी (काँग्रेस)
31) सावर्डे
- गणेश गावकर (भाजप)
- दीपक प्रभू पाऊसकर (अपक्ष)
- विनायक गावस (मगो)
32) शिवोली
- दिलायला लोबो (काँग्रेस)
- दयानंद मांद्रेकर (भाजप)
33) शिरोडा
- सुभाष शिरोडकर (भाजप)
- महादेव नाईक (आप)
34) सांत आंद्रे
- वीरेश बोरकर (रिव्होल्युशनरी गोवन्स)
- फ्रान्सिस सिल्वेरा (भाजप)
35) सांताक्रूझ
- रुडॉल्फ फर्नांडिस (काँग्रेस)
- अंतोनियो फर्नांडिस (भाजप)
- अमित पालेकर (आप)
36) ताळगाव
- जेनिफर मोन्सेरात (भाजप)
- टोनी रॉड्रिग्स (काँग्रेस)
37) थिवी
- नीळकंठ हळर्णकर (भाजप)
- कविता कांदोळकर (तृणमूल)
38) वाळपई
- विश्वजीत राणे (भाजप)
- तुकाराम (मनोज) परब (रिव्होल्युशनरी गोवन्स)
39) वास्को
- कृष्णा (दाजी) साळकर (भाजप)
- कार्लुस आल्मेदा (काँग्रेस)
40) वेळ्ळी
- क्रूझ सिल्वा (आप)
- सावियो डिसिल्वा (काँग्रेस)
शिवोलीत भाजपचा पराभव...
शिवोली मतदारसंघात भाजपचा विजय जवळजवळ निश्चित असताना, आता आलेल्या माहितीनुसार मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार दिलायला लोबो या विजयी झाल्या आहेत; आणि भाजपचे दयानंद मांद्रेकर यांचा शिवोलीमध्ये पराभव झाला आहे. अशाप्रकारे विधानसभा निवडणुकीमध्ये तिसरे दाम्पत्य विजयी झाले आहे. याआधी कळंगुटमधून मायकल लोबो यांचा विजय झाला आहे.
निवडणुकीदरम्यान दिलायला लोबो म्हणाल्या होत्या की, 'मला फक्त मायकल लोबो यांची पत्नी म्हणून राहायचे नसून मला शिवोलीची महिला आमदार म्हणून माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायची आहे.' दिलायला यांनी विजय प्राप्त करून आपले म्हणणे सिद्ध केले आहे.
अपक्ष आणखी उमेदवारांचा भाजपला पाठिंबा
कुठ्ठाळीमधील अपक्ष उमेदवार वाझ आणि कुडतरीमधून आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.
सांतआंद्रे चे RG चे उमेदवार विरेश बोरकर यांनी विजय मिळवला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रीया
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात विजयी झालेल्या आप उमेदवारांचे अभिनंदन केले आहे
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी आप उमेदवार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगास आणि इंजीर क्रूझ सिल्वा यांचे अभिनंदन केले ज्यांनी बाणावली आणि वेळी मधून त्यांच्या जागा जिंकल्या.
"आप'ने गोव्यात दोन जागा जिंकल्या. कॅप्टन वेंझी आणि एर क्रूझ यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. ही गोव्यातील प्रामाणिक राजकारणाची सुरुवात आहे," असे त्यांनी ट्विट केले.
विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष..!
राज्यातील मतदानाचा धावता आढावा
मगोचे मांद्रे मतदारसंघाचे उमेदवार जीत आरोलकर यांनी विजय प्राप्त केला आहे.
काँग्रेस उमेदवार केदार नाईक साळगाव मतदारसंघातून विजयी; जयेश साळगावकरांचा अनपेक्षितरित्या पराभव
रवी नाईक फोंड्यातून विजयी
काँग्रेस नेते मायकल लोबो यांनी व्यक्त केली खंत
आम्ही जिंकू, असे वाटले होते, पण आम्हाला जनतेचा जनादेश स्वीकारावा लागेल. आम्हाला 12 जागा मिळाल्या आहेत, तर भाजपला 18 जागा मिळाल्या आहेत. विरोधी पक्ष म्हणून आम्ही भक्कमपणे काम करू. लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी काँग्रेसला कठोर परिश्रम करावे लागतील: काँग्रेस नेते मायकल लोबो
मये मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रेमेंद्र शेट विजयी
पेडण्यातील भाजपचे उमेदवार प्रवीण आर्लेकर विजयी झाले आहेत.
राज्यात सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी भाजपचे नेते आज गोव्याचे राज्यपालांची भेट घेणार
चंद्रकांत शेट्ये यांच्या विजयानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की शेट्ये यांनी भाजपला आपला पाठींबा जाहिर केला आहे. गोव्यात भाजप सरकार सत्ता स्थापन करणार; आम्ही एमजीपी आणि अपक्ष उमेदवारांना सोबत घेऊ, राज्यात सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते आज गोव्याचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांची भेट घेणार आहेत, असे गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.
आपचे बाणावली मतदारसंघाचे उमेदवार व्हेंजी व्हिएगास यांनी विजय प्राप्त केला आहे.
कळंगुटमधून काँग्रेसचे उमेदवार मायकल लोबो विजयी
गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत यांची प्रतिक्रीया
गोव्यात भाजप सरकार स्थापन करणार; आम्ही एमजीपी आणि अपक्ष उमेदवारांना सोबत घेऊ, असे गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे,"या विजयाचे श्रेय पक्षाच्या कार्यकर्त्यांना जाते
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा जल्लोश
बाबुश मोन्सेरात यांची प्रतिक्रीया
भाजपचा कार्यकर्ता माझ्यासाठी नाही तर विरोधी उमेदवारासाठी काम करतो. काँग्रेसशी लढलो. काही कार्यकर्त्यांच्या आणि समर्थकांच्या पाठिंब्यामुळेच आम्ही जागा राखण्यात यशस्वी झालो: अतानासिओ बाबूश मोन्सेरात, पणजीतील भाजपचे उमेदवार
गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतदान मोजणीचा नववा टप्पा
गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतदान मोजणीचा नववा टप्पा सुरू असून यामध्ये अपक्ष उमेदवार चंद्रकांत शेट्ये यांनी डीचोली मतदारसंघातून 318 मतांनी आघाडी घेतली आहे.
चंद्रकांत शेट्ये यांच्या विजयानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की शेट्ये यांनी भाजपला आपला पाठींबा दर्शवला आहे.
साखळीत मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा विजय, धर्मेश सगलानींची कडवी झुंज
भाजप उमेदवार आणि मुख्यमंत्री प्रमुख सावंत हे साखळी मतदारसंघातून या विधानसभा निवडणुकीसाठी उभे होते. मतमोजणीच्या पहिल्या काही टप्प्यांमध्ये ते पिछाडीवर होते; तर धर्मेश सगलानी हे आघाडीवर होते. पण पुढील टप्प्यांमध्ये त्यांनी आघाडी घेत आता विजय मिळवला आहे. सगलानी यांचा पराभव झाला आहे.
प्रियोळमध्ये गोविंद गावडे 33 मतांनी आघाडीवर. सांतआंद्रेत रिव्हॉल्यूशनरी गोवन्सचे विरेश बोरकर, डिचोलीत अपक्ष डॉ. चंद्रकांत शेट्ये, तर हळदोण्यात काँग्रेसचे कार्लुस फरेरा विजयाच्या मार्गावर. साखळीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना 448 मतांची आघाडी.
राज्यात सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते आज गोव्याचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांची भेट घेणार आहेत.
थिवी मतदार संघातून भाजप उमेदवार नीळकंठ हळर्णकर 2018 मतांनी विजयी
फातोर्डा मतदारसंघाचे उमेदवार विजय सरदेसाई यांचा विजय. 1300 मतांची आघाडी...
विश्वजित राणे हे 8300 मतांनी विजयी
भाजपच्या अजून एका उमेदवाराला या विधानसभा निवडणुकीमध्ये यश प्राप्त झाले आहे वाळपई मतदार संघाचे भाजपचे उमेदवार विश्वजित राणे हे 8300 मतांनी विजयी झाले आहेत विजया नंतर त्यांनी आपले मत व्यक्त करत म्हटले की गोव्यातल्या जनतेने घोटाळा करणाऱ्यांना नकार देत पुन्हा एकदा भाजप सरकारला संधी देण्याचे ठरवले आहे.
सदानंद शेठ तानावडे यांची प्रतिक्रीया
बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे, मला विश्वास आहे की भाजप अर्धा टप्पा पार करेल; सदानंद शेठ तानावडे
पणजीत भाजपने गड राखला; उत्पल पर्रीकर पराभूत
पणजी मतदारसंघात उत्पल पर्रीकर आणि बाबूश मोन्सेरात यांच्यातील लढतीकडे संपूर्ण गोव्याचे लक्ष लागले होते. भाजपने पणजीतून तिकीट नाकारल्याने उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली. मात्र त्यांना भाजपला टक्कर देण्यात अपयश आले आहे. पणजीत बाबूश मोन्सेरात यांनी भाजपचा गड राखला आहे. पणजीत भाजप समर्थक जल्लोष करत आहेत, तर उत्पल पर्रीकर यांच्या गोटात शांतता आहे.
पणजीतून उत्पल पर्रीकर यांची प्रतिक्रीया: 713 मतांनी पिछाडीवर
"अपक्ष उमेदवार म्हणून ही एक चांगली लढत होती, मी लोकांचे आभार मानतो. लढतीबद्दल समाधानी आहे, परंतु निकाल थोडासा निराशाजनक आहे," दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना म्हणतात.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 366 मतांनी आघाडीवर
साखळीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 366 मतांनी आघाडीवर. डिचोलीत अपक्ष डॉ. चंद्रकांत शेट्ये, साळगावात काँग्रेसचे केदार नाईक, सांगेत भाजपचे सुभाष फळदेसाई, वास्कोत भाजपचे दाजी साळकर, तर वेळ्ळीत आपचे क्रूज सिल्वा पुढे.
बिचोलीमध्ये अपक्ष उमेदवार चंद्रकांत शेट्ये आघाडीवर आहेत
विधानसभा अध्यक्ष राजेश पाटणेकर यांचा भाजपसाठी महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या बिचोलीमध्ये अपक्ष उमेदवार चंद्रकांत शेट्ये दोन मतांनी आघाडीवर होते आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नरेश सावळ हे तिसर्या क्रमांकावर होते.
कळंगुट मतदारसंघातून काँग्रेस नेते मायकल लोबो आघाडीवर आहेत
भाजप 19 मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहे
भाजप 19 मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहे, काँग्रेस 10 मतदार संघातून आघाडीवर आहेत, मगो 4 मतदारसंघातून, अपक्ष उमेदवार 3 मतदारसंघातून आघाडीवर आहेत.
भाजप नेते विश्वजित राणे यांची प्रतिक्रिया
गोव्याच्या निवडणुकीत भाजपचा मोठा विजय होईल, असा विश्वास भाजप नेते विश्वजित राणे यांनी गुरुवारी व्यक्त केला. 'गोव्याची ही निवडणूक आम्ही जिंकू. लोकांनी घोटाळेबाजांना, बाहेरच्या लोकांना नाकारले आहे. त्यांनी गोव्यातील लोकांसाठी काम करणाऱ्या पक्षाला मतदान केले आहे,' असे ते म्हणाले.
वाळपई मतदारसंघातून आरोग्यमंत्री विश्वजित राणे विजयाच्या उंबरठ्यावर
विश्वजित राणे हे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे चिरंजीव
गोव्यात आपचे खाते उघडले, 1 जागेवर आघाडी
आम आदमी पक्षाने गोव्यात खाते उघडले आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष असताना, टीएमसी 5 जागांवर आघाडीवर आहे आणि आम आदमी पार्टी 1 जागेवर आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे.
डॉ. प्रमोद सावंत 605 मतांनी आघाडीवर
चौथ्या फेरीनंतर साखळीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 605 मतांनी आघाडीवर. शिवोलीत दयानंद मांद्रेकर, मडगावात दिगंबर कामत पुढे.
गोव्यातील लोकांनी बदलासाठी मतदान केलं आहे, गिरीश चोडणकर
गोव्याचे सीईओ नियंत्रण कक्षात मोजणी प्रक्रियेचे निरीक्षण करतात
गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल 40 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवतात.
मतमोजणी टप्पा तिसरा :
बाबूश मोन्सेरात: 4397
एल्विस गोम्स: 1898
उत्पल पर्रीकर: 3693
राणे दाम्पत्य आजुनही आघाडीवर...
वाळपई मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार विश्वजित राणे हे 5000 मतांनी पुढे आहेत; तर त्यांची पत्नी दिव्या राणे या पर्ये मतदारसंघातून 8000 मतांनी आघाडीवर आहेत.
मडगाव मधून दिगंबर कामत 5849 मतांनी पुढे आहेत.
मतमोजणीच्या दुसऱ्या टप्प्याच्या शेवटी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) हे 317 मतांनी पिछाडीवर आहेत.
कळंगुटचे काँग्रेस उमेदवार मायकल लोगो हे 1907 मतांनी आघाडीवर आहेत.
आकडेवारीनुसार भाजप 18 मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहे, काँग्रेस 12 मतदार संघातून आघाडीवर आहेत, मगो 5 मतदारसंघातूनझ अपक्ष उमेदवार 2, तर गोवा फॉरवर्ड पार्टी आणि आप प्रत्येकी 1 मतदारसंघातून आघाडीवर आहे.
पणजी मतदारसंघातून बाबूश मोन्सेरात 334 मतांनी आघाडीवर
फोंडयातून केतन भाटीकर 131 मतांनी आघाडीवर
सध्याच्या माहितीनुसार, रुडॉल्फ फर्नांडिस सांताक्रुज मतदारसंघातून 1144 मतांनी पुढे आहेत.
भाजप आघाडीवर...
भाजप : 18
काँग्रेस : 12
आप : 1
मगो : 5
इतर : 3
भाजप 15 मतदारसंघांमध्ये आघाडीवर
आकडेवारीनुसार भाजप 15 मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहे, काँग्रेस 14 मतदार संघातून आघाडीवर आहेत, मगो 5 मतदारसंघातूनझ अपक्ष उमेदवार 2, तर गोवा फॉरवर्ड पार्टी एका मतदारसंघातून आघाडीवर आहे.
आपचे सांताक्रुज मतदारसंघाचे उमेदवार अमित पालेकर हे सध्या पिछाडीवर आहेत.
फातोर्डा मतदारसंघातून विजय सरदेसाई 2000 मतांनी पुढे
सांगेमधून सावित्री कवळेकर 1000 मतांनी आघाडीवर
भाजप उमेदवार सुभाष शिरोडकर शिरोडमधून 1500 मतांनी पुढे
काँग्रेस उमेदवार राजेश फळदेसाई हे कुंभारजुवामधून आघाडीवर आहेत तर भाजप उमेदवार जेनीता मडकईकर या पिछाडीवर आहेत.
भाजपचे दोन्ही उपमुख्यमंत्री पिछाडीवर. काँग्रेस उमेदवारांची आघाडी
थिवीमधून नीळकंठ हळर्णकर पुढे आहेत.
ब्रेकिंग - गोवा.. 38/40
भाजप- 13
काँग्रेस- 15
स्वतंत्र-2
आप- १
MGP-6
(Mgp किंगमेकर होण्याची शक्यता)
मतमोजणी टप्पा दुसरा:
1. साळगावमधून केदार नाईक आघाडीवर, तर जयेश साळगावकर पिछाडीवर आहेत
2. मये मतदरसंघांतून प्रेमेंद्र शेट 1000 मतांनी आघाडीवर
3. सांतआंद्रेमधून भाजप उमेदवार फ्रान्सिस्को सिल्वेरा आघाडीवर
4. काँग्रेस उमेदवार कार्लोस फरेरा 1957 मतांनी आघाडीवर
मतमोजणीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये साखळीचे उमेदवार आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे पिछाडीवर आहेत.
पहिल्या फेरीचा धावता आढावा
सुरुवातीच्या ट्रेंडनुसार मतमोजणीच्या पहिल्या फेरीअखेर भाजप 13 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर आहे, एमजीपी 2 जागांवर, आप 1 जागावर आणि अपक्ष 2 जागांवर आघाडीवर आहे.
रोहन खवंटे
पर्वरी मतदारसंघात भाजपचे उमेदवार रोहन खवंटे आघाडीवर आहेत, तर नीलेश काब्राल कुडचडे मतदारसंघात आघाडीवर आहेत.
आघाडी 27/40
भाजपा -16(+5)
काँग्रेस - 5(-9)
AAP+ - 2 (+2)
TMC - 1, OTH - 3(+1)
गोव्यात शिवसेनेचा फ्लॉप शो
राज्यात झालेल्या मतमोजणीत शिवसेना कुठेही दिसत नसल्याने, गोव्यात शिवसेनेचा फ्लॉप शो झाल्याच्या चर्चा सगळीकडे होत आहेत.
भाजप 8 मतदारसंघात आघाडीवर
भाजप 8 मतदारसंघात आघाडीवर, काँग्रेस आणि अपक्ष प्रत्येकी दोन जागी तर आप आणि मगो प्रत्येकी एका जागी आघाडीवर
हळदोणा मतदारसंघ
भाजप : 989
काँग्रेस : 873
टीएमसी : 645
गोव्यात 40 जागांसाठी विधानसभा निवडणुका झाल्या. यातील सर्व जागांचे प्रारंभिक कल उघड झाले आहेत. यावेळी भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. येथे भाजप 18, काँग्रेस 16 आणि टीएमसी 3 जागांवर आघाडीवर आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की टीएमसी येथे किंगमेकर सिद्ध होऊ शकते.
गोवा निवडणूक 2022 निकाल: गोव्यात भाजप, काँग्रेसने MGP पर्याय खुला ठेवला
विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाल्यामुळे गोव्याला भगदाड पडू शकते असे एक्झिट पोल दर्शवत असताना, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (एमजीपी), गोव्याची सर्वात जुनी प्रादेशिक शक्ती, किंगमेकर म्हणून उदयास येऊ शकते आणि त्याला केंद्रस्थानी आणू शकते. भाजप आणि काँग्रेसमधील युद्ध, जे त्यांच्या विजयी उमेदवारांच्या पलीकडे सरकार स्थापन करण्यासाठी पाहणार आहेत.
गोव्यात भाजप 18 जागांसह आघाडीवर आहे
गोव्यात भाजप पहिल्या फेरीत पुढे गेला आहे. भाजप 18 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेस 17 जागांवर पुढे आहे.
मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात खालील उमेदवार आघाडीवर...
ताळगाव : जेनिफर मोन्सेरात
पणजी: बाबूश मोन्सेरात
साळगाव : जयेश साळगावकर
साखळी: धर्मेश सगलानी
थिवी: नीळकंठ हळर्णकर
म्हापसा: ज्योशुआ डिसोझा
हळदोणा: ग्लेन टिकलो
सांतआंद्रे: वीरेश बोरकर
सांताक्रुझ: रुडॉल्फ
शिवोली: दयानंद मांद्रेकर
मये: प्रेमेंद्र शेट
पेडणे: राजन कोरगावकर
मांद्रे :जीत आरोलकर
डिचोली: चंद्रकांत शेट्ये
कुंभारजुवे :राजेश फळदेसाई
वाळपई: विश्वजीत राणे
पर्ये: दिव्या राणे
गोव्यात काँग्रेस 18 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपला एका जागेवर आघाडी मिळाली आहे. येथे तृणमूल 4 जागांवर आघाडीवर आहे.
सुरुवातीच्या आकडेवारीवरून भाजप दोन मतदारसंघात आघाडीवर आहे
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटने दिलेल्या आकडेवारीनुसार सध्या पोस्टल बॅलेट मतदानाची मोजणी सुरू असून, गोव्यातील दोन विधानसभा मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे.
साखळी मतदारसंघातून मुख्यमंत्री सध्या पिछाडीवर
साखळी मतदारसंघात मुख्यमंत्री आणि धर्मेश सगलानी यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. आकडेवारीनुसार धर्मेश सगळ्यांनी हेच आपले मतदार संघातून आघाडीवर आहेत, तर मुख्यमंत्री सध्या पिछाडीवर आहे.
उत्पल पर्रीकर 784 जागांवर तर बाबूश मोन्सेरात 1167 जागांवर
पणजी मतदारसंघातून बाबूश मोन्सेरात 1167, उत्पल पर्रीकर 784 तर एल्विस गोम्स 343 जागांवर आहेत.
पोस्टल बॅलेट मतांची आकडेवारी
पोस्टल बॅलेट मतांच्या आकडेवारीनुसार भाजप 14, कॉंग्रेस 17, मगो 4 आणि इतर 1 अशी मतविभागणी झाली आहे.
विजय सरदेसाई 593 मतांनी आघाडीवर
गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई फातोर्डा मतदारसंघातून 593 मतांनी आघाडीवर
दयानंद मांद्रेकर
शिवोली मतदार संघातून 157 मतांनी दयानंद मांद्रेकर आघाडीवर आहेत
आलेक्स रेजिनाल्ड
अपक्ष उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड कुडतरी मतदारसंघातून आघाडीवर..
जेनिफर मोन्सेरात आघाडीवर
बाबूश मोन्सेरात यांची पत्नी ताळगाव येथून जेनिफर मोन्सेरात यादेखील आघाडीवर आहेत.
गोव्यात बहुमताच्या जवळ काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला
गोव्यातील सर्व जागांवर ट्रेंड आले आहेत. येथे काँग्रेस (Goa Congress) 20 जागांवर आघाडीवर आहे. त्याचवेळी भाजप 16 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे, गोव्यात टीएमसी किंगमेकर असल्याचे सिद्ध होऊ शकते. येथे टीएमसी 4 जागांवर आघाडीवर आहे.
अपक्ष उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड कुडतरी मतदारसंघातून आघाडीवर..
पोस्टल बॅलेट मतांच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार भाजप तीन जागांवर आघाडीवर आहे
गोव्यात सध्या पोस्टल बॅलेट मतांची मोजणी सुरू असताना, सुरुवातीच्या आकड्यांनुसार भाजप तीन जागांवर आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे, तर इतर- दोन जागांवर आहेत.
बाबूश मोन्सेरात पणजी मतदारसंघातून आघाडीवर
बाबूश मोन्सेरात पणजी मतदारसंघातून 383 मतांनी आघाडीवर, त्याचप्रमाणे त्यांची पत्नी ताळगाव येथून जेनिफर बाबूश मोन्सेरात यादेखील आघाडीवर आहेत.
पणजी मतदार संघातून उत्पल पर्रीकर आघाडीवर
पणजी मतदार संघात टपाल मतदान मतमोजणीत अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर हे आघाडीवर होते
गोव्यात बहुमताच्या जवळ काँग्रेस पुन्हा एकदा ठरला सर्वात मोठा
गोव्यातील सर्व जागांवर ट्रेंड आले आहेत. येथे काँग्रेस 20 जागांवर आघाडीवर आहे. त्याचवेळी भाजप 16 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे, गोव्यात टीएमसी किंगमेकर असल्याचे सिद्ध होऊ शकते. येथे टीएमसी 4 जागांवर आघाडीवर आहे.
राणे दाम्पत्य आघाडीवर
मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात वाळपई मधून भाजपचे विश्वजित राणे हे 1300 मताने तर पर्येमधून दिव्या राणे या 2600 मताने आघाडीवर आहेत च्या पहिल्या टप्प्यात वाळपई मधून विश्वजित राणे हे 1300 मताने तर पर्यायांमधून दिव्या राणे या 2600 मताने आघाडीवर आहेत.
भाजप काँग्रेसमध्ये चुरशीची स्पर्धा
गोव्यात काँग्रेस 20 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे भाजप 16 जागांवर आघाडीवर आहे.
काँग्रेस आता 20 जागा घेऊन आघाडीवर
काही वेळापूर्वी भाजप सर्वाधिक जागांवर होते. मात्र आता काँग्रेस आता 20 जागा घेऊन आघाडीवर आहे. तर भाजप अजूनही 16 जागांवर आहे.
लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे विधान
मी कॉंग्रेस सोबत कधीच नव्हतो. भाजपने माझा विश्वासघात केला आहे.
गोव्यातील प्रमुख उमेदवारांची यादी...
निवडणुकीतील प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत (भाजप), विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (काँग्रेस), रवी नाईक (भाजप), लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष), माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाओ (टीएमसी), दिवंगत मुख्यमंत्री मनोहर यांचा समावेश आहे. पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर, माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई (जीएफपी) आणि सुदिन ढवळीकर (एमजीपी) आणि आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अमित पालेकर यांच्यासमोर आहेत.
राज्यात 8.30 पर्यंत भाजप 16 जागांनी आघाडीवर आहे, तर कॉंग्रेस 11 जागांवर मागे आहे.
गोव्यातील 8.30 पर्यंतचा ट्रेंड समोर आला असुन, येथे भाजप 16 जागांवर पुढे आहे. त्याचवेळी काँग्रेस केवळ 11 जागांवर आघाडीवर आहे. तर टीएमसी केवळ 2 जागांवर आघाडीवर आहे.
'दक्षिण गोव्याची मतमोजणी दामोदर कॉलेजमध्ये पार पडणार: दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी रुचिका कटियाल
दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी रुचिका कटियाल यांनी गुरुवारी सांगितले की, 'उमेदवार आणि निरीक्षकांच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम नुकत्याच उघडण्यात आल्या आहेत. पोस्टल मतपत्रिका सुरक्षा कर्मचार्यांच्या समर्पित कॉरिडॉरमधून मतमोजणी हॉलमध्ये नेल्या जातील. दक्षिण गोव्याची मतमोजणी दामोदर कॉलेजमध्ये होणार आहे.
गोव्यात भाजप 8 जागांवर पुढे आहे
गोव्यात भाजप 8 जागांवर आघाडीवर आहे. तर सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस केवळ 6 जागांवर पुढे आहे.
11 पैकी 6 जागांवर काँग्रेस पुढे, तर भाजप 5 वर
गोव्यात मतमोजणी सुरू झाली असून, येथील पहिल्या 11 जागांचे ट्रेंड समोर आले आहेत. येथे काँग्रेस 6 जागांवर आघाडीवर आहे. त्याचवेळी भाजप 5 जागांवर आघाडीवर आहे.
राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) हे मतमोजणी ठिकाणी आता दाखल झाले...
2017 मध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता
40 जागांच्या गोवा विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्च रोजी संपत आहे. राज्यातील शेवटच्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी 2017 मध्ये झाल्या होत्या. 15 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, पण त्यांना सरकार स्थापन करता आले नाही. भाजपने 13 जागा जिंकल्या आणि MGP, GFP आणि दोन अपक्ष आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन करण्यात यश मिळवले. मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री झाले, परंतु 17 मार्च 2019 रोजी मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर डॉ. प्रमोद सावंत यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आले.
गोवा विधानसभा निवडणूक 2022: भाजप, काँग्रेस, टीएमसी रिंगणात
आम आदमी पार्टी (AAP) आणि तृणमूल काँग्रेस (TMC) या पक्षांनी यावेळी राज्यात आक्रमक प्रचार केला आहे. काँग्रेसची गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) सोबत निवडणूकपूर्व युती होती, तर ममता बॅनर्जी यांच्या TMC ने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (MGP) सोबत हातमिळवणी केली. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) यांनीही हातमिळवणी केली, तर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील AAP आणि भाजप सध्या एकट्याने लढत आहेत. मात्र, भाजपने एमजीपीसोबत युती करण्याबाबत बोलणी सुरू असल्याचे सांगितले.
गोव्यात मतमोजणीला सुरूवात
गोव्यात गुरुवारी सकाळी 8 वाजता पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीला सुरुवात झाली.
गोवा ठरला बहुकोणीय स्पर्धेचा साक्षीदार
40 विधानसभा मतदारसंघांमध्ये 300 हून अधिक उमेदवार निवडणूक लढवत असून, गोव्यात भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आप या पक्षांसह बहुकोनी लढत होत आहे. 2017 मध्ये, कॉंग्रेस 17 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता, परंतु 13 जागा जिंकणार्या भाजपने गोवा फॉरवर्ड पार्टी आणि एमजीपी यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते ज्यांनी प्रत्येकी तीन आणि दोन जागा जिंकल्या होत्या. अपक्ष
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष निकालानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती, मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी दिली. तृणमूल चे अभिजित बॅनर्जी गोव्यात आले असून त्यांच्याशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे. तृणमूल, मगो एकत्र निर्णय घेणार असल्याच्या चर्चा असून, मगोला 9 जागा मिळणारअसल्याचा विश्वास ढळीकरांनी व्यक्त केला.
सुशील चंद्रा
मतमोजणी ही पारदर्शक प्रक्रिया असून एक मानक कार्यप्रणाली आहे. या अंतर्गत आम्ही मोजणी करतो. राजकीय पक्षांच्या अधिकृत पोलिंग एजंटना मतमोजणी केंद्रात येण्याची परवानगी आहे. अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी दिली.
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी साखळी येथील श्री दत्त मंदिरात प्रार्थना केली.
उत्पल पर्रीकर मतमोजणी केंद्रावर हजर, थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात
गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत (भाजप), विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (काँग्रेस), माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाओ (टीएमसी), रवी नाईक (भाजप), लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष), माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांची विश्वासार्हता येथे आहे. भागभांडवल त्याचवेळी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांचा आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री उमेदवार अमित पालेकर यांच्याशी सामना आहे.
भाजपचे मुख्यमंत्री उमेदवार प्रमोद सावंत बहुमताने जिंकणार
गोव्यात भाजपचे मुख्यमंत्री उमेदवार प्रमोद सावंत म्हणाले की, आम्ही बहुमताने जिंकत आहोत. आमचा पक्ष सरकार बनवत आहे. युतीच्या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्हीच सरकार स्थापन करणार आहोत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.