Monsoon Fishing Dainik Gomantak
गोवा

Goa Fishing: ..बोटी समुद्रात उतरणार! गोव्यात मासेमारी मोसमाला सुरवात; पारंपरिक मच्छीमारांची लगबग सुरु

Goa Fishing Season: १ जूनपासून बंद असलेली मासेमारी उद्या १ ऑगस्टपासून सुरू होत आहे. मात्र, ट्रॉलरमालकांच्या अपुऱ्या तयारीमुळे उद्यापासून १०० टक्के मासेमारी सुरू होईल असे दिसत नाही.

Sameer Panditrao

सासष्टी: १ जूनपासून बंद असलेली मासेमारी उद्या १ ऑगस्टपासून सुरू होत आहे. मात्र, ट्रॉलरमालकांच्या अपुऱ्या तयारीमुळे उद्यापासून १०० टक्के मासेमारी सुरू होईल असे दिसत नाही.

ट्रॉलरमालकांसमोर खवळलेला समुद्र, मजुरांची कमतरता, साळ नदीच्या पात्राच्या तोंडावर तयार झालेला वाळूचा बंधारा तसेच कुटबण जेटीवरील पूर्ण न झालेली व्यवस्था या सर्वाचे आव्हान आहे. मात्र, बाणावली, कोलवा येथील पारंपरिक मच्छीमारांनी आपली सर्व तयारी केली असून दोन दिवसांपूर्वीच त्यांनी मासेमारीला सुरवात केली आहे.

२१ मे पासून मॉन्सूनपूर्व पावसामुळे ट्रॉलरमालकांनी आपल्या बोटी मासेमारीसाठी समुद्रात पाठविणे बंद केले होते.

गेल्या दहा दिवसांपासून कुटबण जेटीवर ट्रॉलरमालकांची बोट दुरुस्ती, जाळी सुकत घालणे यासारखी कामे सुरू झाली होती. मात्र, गावी परतलेले मजुर अजूनपर्यंत आलेले नसल्याने ते चिंतीत आहेत.

कुटबण फिशरीज सोसायटीचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी सांगितले, की या जेटीवर सुमारे ३००० मजूर आहेत, त्यातील केवळ १० ते १२ टक्केच मजूर परतले आहेत. तरीसुद्धा काही ट्रॉलरमालक मासेमारी उद्यापासून सुरू करण्याच्या तयारीत आहेत.

आरोग्य खात्यातर्फे तपासणी

गेल्या वर्षी कॉलेरामुळे ५ जणांचा मृत्यू झाला होता व शेकडो मजुरांना त्याची लागण झाली होती. त्यामुळे यंदा आरोग्य खात्याने कुटबण जेटीवर आरोग्य तपासणीची मोहीम राबवली आहे. २५ जुलै पासून आपल्या गावी गेलेले मजुर परतायला सुरवात झाली आहे व प्रत्येक मजुराची तपासणी केली जात आहे. मच्छरांचा फैलाव होऊ नये म्हणूनही आरोग्य तसेच मत्स्यव्यवसाय खात्याने सर्व उपाययोजना केली आहे. कुटबण जेटीवर शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. बोटमालकांनी सुलभ शौचालयासाठी मासिक रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.

कुटबण व्यवस्थापन बदल

कुटबण जेटीचे व्यवस्थापन मत्स्यव्यवसाय संचालनालय कुटबण बोटमालक महासंघाकडे सोपविण्याच्या विचारात आहे. मात्र, महासंघातील सदस्यांमध्ये त्यासाठी मतभेद असल्याने व्यवस्थापन बदल लांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महासंघामध्ये वेगवेगळ्या संघटनांकडे संबंधित बोटमालक आहेत. ही जेटी मत्स्यव्यवसाय संचालनालयाची आहे. त्यामुळे त्यांचेच व्यवस्थापन असेल तर चांगले होईल असे काही बोटमालकांचे मत आहे. मात्र, कुटबण बोटमालक संघटनेचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी व्यवस्थापन त्यांच्या हातात देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. महासंघात तीन सोसायटीचे ३०० सदस्य आहेत व सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्णय घेतला आहे, असे डिसिल्वा यांनी स्पष्ट केले.

कचरा उचलण्यास पंचायतीचा नकार

वेळ्ळी पंचायतीने कुटबण जेटीवरील कचरा उचलण्यास मत्स्यव्यवसाय संचालनालयाला सरळ नकार दिला आहे. कुटबण जेटीकडून पंचायतीला योग्य तो महसूल मिळत नाही. त्यामुळे तेथील कचरा उचलणे पंचायतीला परवडत नसल्याचे वेळ्ळीच्या सरपंच विणा कार्दोज यांनी सांगितले. काल पंचायतीतर्फे कुटबण जेटीवर स्वच्छता व फॉगिंग मोहीम आयोजित करण्यात आली होती, तेव्हा सरपंचाने वरील माहिती दिली. मत्स्यव्यवसाय संचालनालयाने कचरा उचलण्यासाठी आमच्याकडे संपर्क साधला होता, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रस्ते झाले मस्त, मरण झाले स्वस्त! वाढत्या अपघातांना जबाबदार कोण?

PM Kisan 20th Installment: पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; असा तपासा बॅलन्स

न्‍यायालयांत 60,354 प्रकरणे प्रलंबित, राज्यात 15,392 प्रकरणांवर पाच वर्षांहून अधिक काळ निर्णय नाही

Goa News Live Update: शिगाव येथे श्री सातेरी देवस्थानचा मुख्य दरवजाचा उघडण्याचा प्रयत्न, चोरटे फरार

Bicholim: प्रामाणिक सोनारामुळे महिलेला मिळाले हरवलेले मंगळसूत्र, व्हॉट्‌सॲप ग्रुप ठरला फायद्याचा

SCROLL FOR NEXT