मच्छिमारांना (Fisherman) संरक्षण देण्यास सरकार अपयशी झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा  Dainik Gomantak
गोवा

काणकोण मच्छिमार व्यावसायिकांचा सरकारला इशारा

मच्छिमारांवर (Fisherman) समुद्रात आक्रमण करणे ही गंभीर बाब आहे त्यासाठी सरकारने उपाय योजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमन्तक

काणकोण: आठ दिवसांच्या आंत तळपण जेटीवर तटरक्षक दलाला हायस्पीड गस्तीची बोट देऊन काणकोण (Kankon) मधील मच्छिमारांना (Fisherman) संरक्षण देण्यास सरकार अपयशी झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आज तळपण येथील मच्छीमार व्यावसायिकांच्या सभेत देण्यात आला. 25 नोव्हेंबरला काणकोण मधील मच्छिमारावर समुद्रात बेछूट लोखंडी गोळ्यांचा मारा काणकोण मधील समुद्रात घुसून मालपे- कर्नाटक (Karnataka) मधील हायस्पीड बोटीच्या मच्छीमारांनी केला.

काणकोमधील व्यावसायिकांनी त्यांची सुमारे तीन लाख किमंतीची जाळी जप्त केली मात्र तटरक्षक दलाने त्याचा पंचनामा करण्यापलिकडे काहीच केले नाही. त्या बोट मालकाविरूद्ध गुन्हा दाखल होणे गरजेचे होते मात्र अद्याप त्याच्यावर कारवाई झाली नाही त्याचप्रमाणे मत्स्योद्योग खात्याने त्यासबंधी कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष रन्ताकर धुरी यांनी केला. या वेळी आपचे स्थानिक नेते अनुप कुडतरकर यांनी सरकार फक्त मच्छिमारांना निवडणुकीपुरते वापरून घेत आहे. मच्छिमारांवर समुद्रात आक्रमण करणे ही गंभीर बाब आहे त्यासाठी सरकारने उपाय योजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

यावेळी माजी नगराध्यक्ष दिवाकर पागी, कॉंग्रेस गटाध्यक्ष,तसेच कॉंग्रेसचे जनार्दन भंडारी यांनी मत्स्योद्योग खात्याच्या अकार्यक्षमते बद्धल टिका केली.सरकारच्या नियमानुसार जास्तीत जास्त बोटीना 250 अश्वशक्तीचे इंजिन बसवून मासेमारी करता येते मात्र मालपे मंगळूर येथील मासेमारी बोटी सरकारी नियम मोडून 750 अश्वशक्तीचा मोटर बोटीना बसवून मासेमारी करीत आहेत त्याचा फटका लहान बोटी,पाती द्वारे मासेमारी करणाऱ्या मत्सव्यावसायिकाना बसत असल्याची कैफीयत मच्छिमारानी मांडली.

कर्नाटक व गोवा मत्स्योद्योग खात्याच्या अधिकाऱ्यांची सहा दिवसांत बैठक

मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून सहा दिवसांत कर्नाटक व गोवा मत्स्योद्योग खात्याच्या अधिकाऱ्यांची सहा दिवसांत बैठक घेऊन या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन काणकोणचे आमदार तथा उपसभापती इजिदोर फर्नांडीस यांनी उपस्थित मत्सव्यावसायिकाना दिले.तळपण येथील किनाऱ्यावरील संरक्षक भिंत,जाळीविणण्याच्या वास्तूचे नुतनीकरण व अन्य विकास कामे करण्यात आली आहे.येथील रहिवाशांचे सदैव हीत पाहिले आहे.मासेमारी हा येथील रहिवाशाच्या उपजिविकेचे साधन आहे त्यासाठी त्याच्या लढ्यात सदैव आपला पाठिंबा असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आठ दिवसांत एल ई डी मासेमारी बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा

आठ दिवसांत एल ई डी मासेमारी बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा देणारा ठराव या बैठकीत समंत करण्यात आला.नेशनल फिशरीज फॉरमचे जनरल सेक्रेटरी ओलानसियो सिमोईश यांनी हा ठराव मांडला त्याला उपस्थित मच्छिमार व्यावसायिकांनी उभे राहून अनुमोदन दिले.एल ईडी मासेमारी बरोबरच गोव्याच्या हद्दीत

घुसखोरी करून करण्यात येणारी मासेमारी बंद करण्याची मागणी त्यांनी केली.यावेळी ओल्ड क्रॉस फिशरमॅन असोशियनचे कुस्तोडियो डिसोझा,फिशरमॅन असोशियनचे अध्यक्ष अशोक धुरी,गाबित समाजाचे अध्यक्ष तुळशीदास ठक्कर यांनी सरकार मत्स्य व्यावसायिकांना संरक्षण देण्यास अपयशी ठरत असल्याबद्धल टिका केली.सभेचे सुत्रसंचालन पंच रूद्रेश नमशीकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: प्रदूषण मंडळाचा दणका! शापोरातील दोन नाईट क्लब सील, ध्वनी मर्यादा मिटर न वापरल्याने कारवाई

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT