Jetty  Dainik Gomantak
गोवा

बाणावली जेट्टी प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी गोवा स्टेट कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीचे एक पथक समुद्रकिनाऱ्यावर तपासणी करताना आढळून आले.

दैनिक गोमन्तक

मडगाव: पश्चिम बायपास प्रकल्प आणि सांडपाण्याच्या पाईपलाईनचे बहुचर्चित प्रश्न अद्याप सुटलेले नसताना यातच आता बाणावली जेट्टीचा प्रश्न समोर आला आहे. सरकार बाणावली बीचवर जेट्टी उभी करण्याचा घाट घालत असल्याने, पारंपारिक मच्छीमार आणि पर्यटनाशी (Tourism) संबंधित व्यवसायात गुंतलेले इतर लोक अस्वस्थ झाले आहेत. त्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे. (Fishermen strongly oppose Benaulim jetty project in goa)

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी गोवा स्टेट कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (GCZMA) चे एक पथक समुद्रकिनाऱ्यावर तपासणी करताना आढळून आले. हे पथक जेट्टी प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करत होते, अशी माहिती समोर आली आहे.

“आम्ही आधीच विविध कारणांमुळे अडचणीत आहोत. या प्रस्तावित जेट्टीचा आमच्या उपजीविकेवर नक्कीच वाईट परिणाम होईल. हा प्रकल्प करू नये अशी आमची सरकारला विनंती आहे”, असे मच्छीमार म्हणाले.

पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यवसायात गुंतलेल्या स्थानिकांनीही हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास आपली उपजीविका गमावण्याची भीती व्यक्त केली आहे. सरकारने या प्रकल्पावर फेरविचार करावा, अशी त्यांची इच्छा असून, आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT